Satara BJP : सावरकर गौरव यात्रा आजपासून सातारा जिल्ह्यात निघणार... जयकुमार गोरे

Waduj City वडूज शहरात सहा तारखेला सावरकर गौरव यात्रा हुतात्म्यांना अभिवादन करून काढली जाईल. तशीच सर्व तालुक्यांत भाजप व शिवसेनेच्या माध्यमातून यात्रा निघेल.
BJP MLA Jaykumar Gore
BJP MLA Jaykumar Goresarkarnama

Jaykumar Gore News : काँग्रेसचे नेते राहुल गांधी Rahul Ghandhi यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सातत्याने अपमान होत आहे. यामुळे सावरकरांची मलिन होत असलेली प्रतिमा पुन्हा उंचावण्यासाठी भारतीय जनता पक्ष BJP व शिवसेनेची Shivsena आजपासून (ता. ३१) ते सहा एप्रिल या कालावधीत सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये रथ तयार करून सावरकरांच्या जीवनपटाची माहिती दिली जाणार असून, प्रत्येक ठिकाणी पाच हजार कार्यकर्ते यात्रेत सहभागी होतील, अशी माहिती जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी दिली

सातारा शासकीय विश्रामगृहात सावरकर गौरव यात्रेच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी आमदार गोरे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी भाजपचे नेते अतुल भोसले, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार गोरे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यलढ्यात ज्या पद्धतीने लढा दिला. त्यातून प्रेरणा घेत अनेक स्वातंत्र्यवीर निर्माण झाले.

अंदमान, निकोबारमधील जेलमध्ये त्यांना खूप त्रास देण्यात आला, तरीही त्यांनी स्वातंत्र्याची धग तेवत ठेवली. सावरकरांचा विचार डोळ्यासमोर ठेऊन खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान केला. काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन केले.

BJP MLA Jaykumar Gore
Satara News : २०२४ ला पुन्हा भाजपचीच सत्ता येणार; माझ्यासहित चौघे आमदार होणार...

राहुल गांधी यांच्या यात्रेत आदित्य ठाकरे, तसेच राष्ट्रवादीचे मोठे लोक सहभागी झाले. या सगळ्यांनी सावरकर यांच्याबाबत भूमिका जाहीर करणे गरजेचे आहे. आता सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत राहणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकरांच्या स्मारकासाठी ११ हजारांची देणगी दिली होती, तसेच त्यांचे सरकार असताना त्यांच्या नावाने टपाल तिकीट काढले होते. याचा विचार राहुल गांधींनी करायला हवा.’’

BJP MLA Jaykumar Gore
Rahul Gandhi Support South Actress : राहुल गांधींचा भावनिक आधार नसता, तर आज जिवंत नसते ; कन्नड अभिनेत्रीची स्तुतीसुमने!

सावरकरांवर सातत्याने टीका केली जात असून, राष्ट्रवादीचे काही नेते तर औरंगजेबाचे कौतुक करत आहेत. सध्या सावरकर यांची मलिन होत असलेली प्रतिमा पुन्हा उंचावण्यासाठी भाजपकडून सावरकर गौरव यात्रेचे नियोजन केले आहे. ३१ मार्च ते सहा एप्रिल या कालावधीत राज्यभर ही यात्रा निघणार आहे. वडूज शहरात सहा तारखेला सावरकर गौरव यात्रा हुतात्म्यांना अभिवादन करून काढली जाईल. तशीच सर्व तालुक्यांत भाजप व शिवसेनेच्या माध्यमातून यात्रा निघेल. यामध्ये भाजपचे सर्व आमदार व नेते, कार्यकर्ते सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले.

BJP MLA Jaykumar Gore
Satara : गिरीश बापट यांच्या निधनामुळे शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com