शिंदे गटातही ‘सावंत सेने’चा सवतासुभा; सावंतांच्या बैठकीला प्रमुख पदाधिकाऱ्यांची पाठ

सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात शिंदे गटाकडून मंत्री तानाजी सावंत यांचे भाऊ शिवाजी सावंत यांनी मुलाखती घेतल्या. या मुलाखतीला शिंदे गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दांडी मारली.
Eknath shinde-Tanaji sawant
Eknath shinde-Tanaji sawantSarkarnama

सोलापूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार येताच सोलापुरात शिंदे गट (Eknath Shinde) सक्रिय झाला आहे. शपथविधीपर्यंत जिल्ह्यात एकसंध असलेली शिवसेना शपथविधीनंतर दोन गटात विभागली. एवढ्यावर न थांबता जिल्ह्यातील शिंदे गटात पुन्हा नवा सावंत गट वेगळा असल्याचे जाणवू लागले आहे. सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात शिंदे गटाकडून मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे भाऊ शिवाजी सावंत यांनी मुलाखती घेतल्या. या मुलाखतीला संजय कोकाटे, नागेश वनकळसे, सोमेश क्षीरसागर व पंढरपूर येथील महेश साठे यांनी दांडी मारली होती. ('Savant Sena' showed an independent existence even in the Shinde group)

शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर आले, तेव्हा पहिल्या दौऱ्यात निवडक मावळे नव्या शिंदे गटात सक्रिय झाले होते. यामध्ये लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, संजय कोकाटे, सोमेश क्षीरसागर, नागेश वनकळसे यांचा समावेश होता. पंढरपूरच्या पहिल्या नव्या शिवसैनिकांच्या मेळाव्याला शिवसैनिकांपेक्षा अधिक वारकरीच होते. मात्र, सत्ता स्थिरस्थावर होऊन मंत्रिपद जिल्ह्यातील भूमिपूत्र तानाजी सावंत यांच्याकडे येताच नव्या शिंदे गटात जोरदार ‘इनकमिंग’ सुरू झाले. यात मूळ शिवसैनिकांपेक्षा राष्ट्रवादीतून अलीकडे शिवसेनेत आलेल्या पदाधिकाऱ्यांचा भरणा जादा होता.

Eknath shinde-Tanaji sawant
मोठी बातमी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार राज ठाकरे यांची भेट

आज शिंदे गटाचा पसारा वाढत आहे. मात्र, नव्या शिंदे गटातही मूळ शिवसेनप्रमाणे पुन्हा सावंत सेना सक्रिय होत आहे. हे नुकत्याच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखतीवरून दिसून आले आहे. या मुलाखतीच्या कार्यक्रमास संजय कोकाटे, सोमेश क्षीरसागर, नागेश व्हनकळसे यांच्यासह अनेकांनी पाठ फिरवली होती. यावरून नव्या शिंदे गटातही पुन्हा सावंत सेना सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे.

Eknath shinde-Tanaji sawant
भाजप नेत्यांसोबत पंगा घेतलेल्या अधिकाऱ्यांना टेंन्शन की एक्‍सटेंशन?

शिवसेना आणि शिंदे गट यांचा वाद न्यायप्रविष्ठ आहे. शिवसेना हे संघटनेचे नाव व धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार, याचा निर्णय होणे बाकी आहे. असे असताना नव्या शिंदे गटाकडून चार जिल्हाप्रमुखांच्या नेमणुका झाल्या आहेत. मनीष काळजे, चरणराज चवरे, महेश चिवटे आणि अमोल शिंदे यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. प्रत्यक्षात शिंदे गटाची जिल्ह्यातील चारच तालुक्यात व्याप्ती आहे. सांगोला, मोहोळ, माढा आणि करमाळा या चार तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यात उमेदवार उभा करणेही अशक्य आहे. संपूर्ण शिवसेनेचा एकत्रित विचार केला तर जिल्ह्यात एकच आमदार आहे आणि आठ जिल्हाप्रमुख आहेत. महिला आघाडी, युवती व युवसेना यांना विचारात न घेताही जनमत असलेल्या उमेदवारांपेक्षा पदाधिकाऱ्यांची संख्या खूप मोठी झाली आहे.

Eknath shinde-Tanaji sawant
शहाजीबापू, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा अन्‌ मतदारसंघात लक्ष द्या : शिवसेनेकडून प्रत्युत्तर

दोन्ही गटांना संघटना बांधणीची इतकी घाई झाली आहे की यात जनाधार असलेल्या जनतेची कामे करणाऱ्या अथवा ज्यांना कडवा शिवसैनिक म्हटले जाते यापेक्षा अवैध व्यवसायायिकांचा भरणा होत आहे. यामध्ये चंदन तस्कर, वाळू तस्कर व मद्यसम्राटांची भरती सुरू आहे. यामुळे भविष्यात या राजकीय पक्षाचा वापर संघटना वाढीऐवजी स्वत:चे अवैध उद्योग सुरू ठेवण्यासाठीच जादा होणार आहे.

Eknath shinde-Tanaji sawant
जलसंपदा खाते येणार सोलापूरच्या वाट्याला; भाजपच्या वरिष्ठ आमदाराचे नाव आघाडीवर

शिंदे गटाच्या वतीने प्रा. शिवाजी सांवत यांनी नुकत्याच नूतन पदाधिकारी निवडीसाठी मुलाखती घेतल्या. यामध्ये निवडीचा निकष हा गर्दी जमविणे होता. या मुलाखतीला अनेकांनी दांडी मारली होती. हीच अवस्था रविवारी झालेल्या युवा सेनेच्या बैठकीची होती. शरद कोळी यांची युवा सेनेच्या राज्य विस्तारक पदावर निवड झाली आहे. आदित्य ठाकरे यांच्यानंतर संघटनेत क्रमांक दोनचे पद असल्याचा कोळी यांचा दावा आहे. युवा सेनेच्या बैठकीलाही निवडक पदाधिकाऱ्यांचीच उपस्थिती होती. एकंदरीत शिवसेनेच्या दोन्ही गटांत पुन्हा फुटाफूटीचे वातावरण आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in