प्रतापगड कारखान्याच्या अध्यक्षपदी सौरभ शिंदे; उपाध्यक्ष पदी शिवाजीराव मर्ढेकर

अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी Manohar Mali यांनी जाहीर केले.
Saurabh shinde, shivaji Mardhekar
Saurabh shinde, shivaji Mardhekarkudal reporter

कुडाळ : जावळी तालुक्यातील कुडाळा येथीलप्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी जावळीचे उपसभापती सौरभ शिंदे यांची, तर उपाध्यक्ष पदी शिवाजीराव मर्ढेकर यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.

कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक सहकार पॅनलचे सर्व 21 उमेदवार बहुमताने निवडून आले होते. आज अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडी करण्यासाठी नुतन संचालक मंडळाची बैठक बोलावली होती. या वेळी अध्यक्षपदासाठी सौरभ शिंदे व उपाध्यक्षपदासाठी शिवाजीराव मर्ढेकर यांचा प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी जाहीर केले.

Saurabh shinde, shivaji Mardhekar
२१-०...,सौरभबाबा हिरो...; प्रतापगड कारखान्यात संस्थापक सहकार पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व

आगामी गळीत हंगाम कोणत्याही परिस्थितीत स्वबळावर सुरु करण्यात येणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी यावेळी दिली. सर्व सभासदांनी मोठ्या विश्वासाने संचालक मंडळाला मोठ्या मताधिक्काने निवडून देऊन जी जबाबदारी संचालक मंडळावर टाकली आहे. ती सर्वांच्या सहकार्याने नक्कीच पूर्ण करणार असून, कारखाना सुरू करणे हीच आमची खरी जबाबदारी असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Saurabh shinde, shivaji Mardhekar
शरद पवारांच्या पुढाकाराशिवाय मोदींना पर्याय मिळू शकणार नाही!

उपाध्यक्ष अॅड. मर्ढेकर म्हणाले,‘‘ माजी आमदार लालसिंगराव शिंदे व राजेंद्र शिंदे यांना जशी साथ दिली. त्याच ताकदीने यापुढेही सौरभ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे.’’ श्रीमती सुनेत्रा शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालक राजेंद्र शिंदे यांनी आभार मानले. निवडीनंतर अनेक मान्यवरांनी नुतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. बैठकीस संचालक राजेंद्र शिंदे, आनंदराव मोहिते, शांताराम पवार, अंकुशराव शिवणकर, रामदास पार्टे, प्रदिप शिंदे, प्रदिप तरडे, आनंदराव जुनघरे, बाळासाहेब निकम, गणपत पार्टे, दिलिप वांगडे, बाळकृष्ण निकम, कुसुम गोसावी, विजय शेवते, शोभाताई बारटक्के, ताराबाई पोफळे, विठ्ठल मोरे, कार्यकारी संचालक राजेंद्र भिलारे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in