सत्यशोधक आनंदराव शिंदे यांचे निधन; देहदान, नेत्रदानाची इच्छा अपूर्ण राहिली

आयुष्यभर सत्यशोधकीय विचार त्यांनी जोपासले. त्यांच्या मुलासह नातवांचे विवाह त्यांनी सत्यशोधकी पद्धतीने लावले होते.
सत्यशोधक आनंदराव शिंदे यांचे निधन; देहदान, नेत्रदानाची इच्छा अपूर्ण राहिली
Anandrao Shindesakal

सातारा : वाई तालुक्यातील बोपेगाव येथील सत्यशोधक विचारांचे कार्यकर्ते ॲड. आनंदराव शिंदे (वय ९५) यांचे साताऱ्यातील खासगी रूग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर शासकिय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची देहदान व नेत्रदानाची इच्छा कोरोनाच्या संसर्गामुळे पूर्ण होऊ शकली नाही.

वाई पंचक्रोशीतील १९५० च्या दशकातील कृषी पदवी मिळवणारे ते पहिले पदवीधर होते. त्यांनी नोकरी करीत एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले होते. केंद्र सरकारच्या कस्टम खात्यातून अस्स्टिंट कलेक्टर म्हणून ते निवृत्त झाले होते.

Anandrao Shinde
सातारा नियोजन समितीचा पाच टक्के निधी अतिवृष्टीग्रस्तांसाठी राखीव

आयुष्यभर सत्यशोधकीय विचार त्यांनी जोपासले. त्यांच्या मुलासह नातवांचे विवाह त्यांनी सत्यशोधकी पद्धतीने लावले होते. त्यांची देहदान व नेत्रदानाचीइच्छा कोरोनाच्या संसर्गामुळे पूर्ण होऊ शकली नाही. त्यांच्या आठवणी सांगणारे आनंदयात्री हे आत्मचरित्रपर पुस्तकही प्रसिद्ध झालेले आहे.

Related Stories

No stories found.