शिवसेनेच्या वाढलेल्या मताधिक्क्यानेच सत्यजितसिंह पाटणकरांचा थयथयाट...

पाटण शहरातील Patan City मतदार Voters हे आता तुमच्या दहशतीखाली असले तरी भविष्यात कुणाचा कार्यक्रम करेक्ट करायचा हे ही जनतेने आत्ताच ठरवले आहे, असा सूचक इशारा मंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी विरोधकांना केला.
Shambhuraj Desai, Satyajitsinh Patankar
Shambhuraj Desai, Satyajitsinh Patankarpatan reporter

मोरगिरी : सत्यजितसिंह पाटणकर तुम्ही पाटण नगरपंचायतीवर ज्या पक्षाची सत्ता आली आहे, म्हणून टिमकी वाजवताय त्या पक्षाच्या चिन्हावर एक तरी सदस्य तुमचा निवडून आला आहे का? ज्या पक्षाच्या नावावर मोठे झाला त्या पक्षाचे नावच गायब करणारे आपले निष्क्रिय कर्तृत्व पाटण शहरातीलच नव्हे तर आता संपूर्ण जिल्ह्याने पाहिले आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीत पाटणमध्ये शिवसेना पक्षाला वाढलेल्या मताधिक्याने सत्यजितसिंहाचा थयथयाट सुरु आहे, असा हल्लाबोल राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांच्यावर प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ''आम्हाला या निवडणुकीत सत्तेचा राजकीय वापरच करायचा असता, तर तो आम्हाला बँकेत अथवा कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी बसून करायची गरज भासली नसती. तर तो आम्ही थेट आणि करेक्टच केला असता, हे तुमच्यासहित तुमच्या बगलबच्च्यांनाही ही माहित आहे.'' सत्यजित पाटणकर तुम्ही आमच्या मरळी गावाची काळजी अजिबातच करू नका. ते लोकनेत्यांचे आणि त्यांच्याच विचारांचे गाव आहे आणि त्यासाठी आम्ही सक्षम आहोत.

Shambhuraj Desai, Satyajitsinh Patankar
शंभूराज देसाई भुलथापा मारण्यात पटाईत : सत्यजितसिंह पाटणकर

जे आपले उमेदवार निवडून आलेत ते किती मतांच्या फरकाने निवडून आलेत, याचा गवगवा का करत नाही. त्यामुळे नेमके कुणाला मतदारांनी नाकारले आहे हे लवकरच जनतेलाही कळेल. आमचे दोन जरी सदस्य असले तरी ते सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठीच झटत राहतील. पाटण शहरातील काही अंशी मतदार हे आता जरी तुमच्या दहशतीखाली असले तरी भविष्यात कुणाचा कार्यक्रम करेक्ट करायचा हे ही जनतेने आत्ताच ठरवले आहे, असा सूचक इशारा मंत्री देसाई यांनी विरोधकांना केला.

Shambhuraj Desai, Satyajitsinh Patankar
शंभूराज देसाई म्हणतात, आगामी निवडणुकीतच विरोधकांना 'ट्रेलर' दाखवतो...

त्याचबरोबर निवडणुकीमध्ये पाटण नगरपंचायतीच्या विकासासाठी जो शब्द दिला होता. तो शब्द शिवसेना आणि तिथला स्थानिक आमदार म्हणून आणि राज्याचा राज्यमंत्री म्हणून आम्ही आणि लोकांच्या विकासासाठी आम्ही सतत कटिबद्ध राहणारच आणि तशी अपेक्षा ही शहरातील जनतेची आहे याची आपणाला निश्चित खात्री आहे, असा पुनरोच्चार ही मंत्री देसाई यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com