दरोडेखांरांच्या टोळीचा पोलीस उपनिरीक्षकावर सत्तूरचा वार

राहुरी तालुक्यातील वाढती गुन्हेगारी ही अहमदनगर जिल्हा पोलीस प्रशासनासमोर डोकेदुखी ठरत आहे.
Crime
CrimeSarkarnama

राहुरी (जि. अहमदनगर ) - अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरात काही महिन्यांपूर्वी गावठी पिस्तोल तयार करणारा कारखानाच पोलिसांनी शोधून काढला होता. तर आता राहुरी शहरात दरोडेखोरांनी चक्क पोलीस उपनिरीक्षकावर सत्तूरने हल्ला चढवत जखमी केले आहे. त्यामुळे राहुरी तालुक्यातील वाढती गुन्हेगारी ही अहमदनगर जिल्हा पोलीस प्रशासनासमोर डोकेदुखी ठरत आहे. ( Sattur's attack on a police sub-inspector by a gang of robbers )

राहुरी शहरात सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीला पकडताना थरारनाट्य घडले. पाठलाग करणारे पोलिस उपनिरीक्षक नीरज बोकील यांच्यावर सत्तूरचा वार झाला. पाचपैकी सराईत चार गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एक जण फरार झाला. दरोड्याच्या साहित्यासह एक लाख 83 हजार 615 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली. हा प्रकार काल (शनिवारी) पहाटे घडला.

Crime
राहुरी कृषी विद्यापीठाचे बियाणे उगवेना : 12 शेतकऱ्यांना द्यावी लागणार नुकसान भरपाई

शहरातील मल्हारवाडी रस्त्यावर सातपीर बाबा दर्ग्याजवळ चोरट्यांची टोळी आल्याची खबर राहुरी पोलीस ठाण्यात मिळाली. रात्रीच्या गस्ती पथकातील पोलिस उपनिरीक्षक नीरज बोकील, पोलीस कॉन्स्टेबल नदिम शेख, महेश शेळके, जालिंदर साखरे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच दरोडेखोर पळू लागले. त्यांचा पाठलाग करून मयूर राजू ढगे (वय 21), ईश्वर अशोक मोरे (वय 20, दोघेही रा. निफाड, नाशिक) यांना घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले.

Crime
पोलिसांना पाहताच दरोडेखोर पळाले, अखेर एक पकडला, राहुरी तालुक्यातील घटना

दरम्यान, झटापटीत आरोपी ढगे याने पोलीस उपनिरीक्षक बोकील यांच्या डाव्या हातावर सत्तूरचा वार करून त्यांना जखमी केले. तीन आरोपींनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. राहुरी फॅक्टरी येथे तिसरा आरोपी राहुल रमेश वाकोडे (रा. निफाड) याला ताब्यात घेण्यात आले. आरोपी रणजित केशव कांबळे (रा. निफाड) याला शिर्डी ताब्यात घेण्यात आले. राहुरीत पकडलेल्या दोन आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी अजय पवार गावठी पिस्तुलासह फरार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा करीत आहेत. सुरक्षारक्षकास मारहाण

या टोळीने पहाटे दीड वाजता मल्हारवाडी रस्त्यावरील खासगी सुरक्षारक्षक प्रवीण अर्जुन धनवडे (रा. बारागाव नांदूर) यांच्या डोक्याला गावठी पिस्तूल लावून जबर मारहाण केली. त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून घराच्या बाहेरील खुर्चीला दोरीने बांधून ठेवले. प्रमोद रत्नाकर भागवत (रा. मल्हारवाडी रस्ता, राहुरी) यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून 42 हजार 500 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरली.

Crime
दरेकरांनी आडनाव बदलून दरोडेखोर करावं! नाना पटोलेंचा खोचक सल्ला

सराईत गुन्हेगार

पोलीस उपनिरीक्षकावर सत्तूरने हल्ला करणारा आरोपी ढगे याच्यावर नाशिक जिल्ह्यातील निफाड, घोटी, अंबड, भद्रकाली पोलीस ठाण्यांत दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com