पाहिल्याच दिवशी दोघांची माघार अन्‌ सतेज पाटलांची बिनविरोध निवड पक्की!

सतेज पाटील यांच्या कोल्हा जिल्हा बॅंकेच्या बिनविरोध निवडीवर अखेर शिक्कामोर्तब
पाहिल्याच दिवशी दोघांची माघार अन्‌ सतेज पाटलांची बिनविरोध निवड पक्की!
Satej PatilSarkarnama

कोल्हापूर : उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या आज (ता. ७ डिसेंबर) पहिल्याच दिवशी गगनबावडा तालुका विकास संस्था गटातील दोन उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Kdcc bank) संचालकपदाच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले. याबाबतची अधिकृत घोषणा निवडणुकीच्या निकालादिवशी (ता. ७ जानेवारी) होणार आहे. (Satej Patil's unopposed election finally sealed)

कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सर्व गटातून एकूण २७५ जणांचे अर्ज दाखल होते. छाननीत सोमवारी (ता. ६ डिसेंबर) विविध गटातील १९ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. जिल्हा बँकेसाठी येत्या ५ जानेवारीला मतदान होणार आहे. गगनबावडा तालुका विकास संस्था गटातून पालकमंत्री पाटील यांच्यासह त्यांच्या गटाचे प्रसाद लाड व महादेव पडवळ यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, या गटातील विद्यमान संचालक पी. जी. शिंदे यांनी अर्जच दाखल केला नव्हता. त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच पाटील यांची बिनविरोध निवड निश्‍चित होती.

Satej Patil
गब्बरसिंगला लाच घेताना पकडले...तो मोटारसायकल टाकून पळाला..पण शेवटी गाठलेच!

दरम्यान, प्रसाद लाड आणि महादेव पडवळ यांनी माघार घेतल्याने पालकमंत्री पाटील यांच्या बिनविरोध निवडीवर आज शिक्कामोर्तब झाले. याबाबतची अधिकृत घोषणा निकालाच्या दिवशी म्हणजेच ७ जानेवारी रोजी होणार आहे

Satej Patil
राष्ट्रवादीच्या रेवणनाथ दारवटकरांची सलग सातव्यांदा बाजी!

दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा बॅंकेची २००० मधील निवडूक गगनबावडा संस्था गटातून लढवली होती. त्यावेळी त्यांचा सामना पी.जी. शिंदे यांच्याशी झाला होता. पाटील हे पहिल्यांदाच या तालुक्‍यातून जिल्हा बॅंक निवडणुकीत उडी घेतली होती. तरीही या ठिकाणी त्यावेळी विद्यमान असणारे पी.जी. शिंदे हेच बाजी मारतील, असे चित्र होते. मात्र पाटील यांनी हे मैदान मारुन जिल्हा बॅंकेत संचालक म्हणून प्रवेश केला होता.

Satej Patil
आमदार संग्राम थोपटेंची बिनविरोध निवड : जिल्हा बॅंकेच्या संचालकपदाची हॅट्‌ट्रीक!

त्यानंतर पाटील यांनी जिल्हा बॅंकेच्या व्यक्ती सभासद गटातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी माजी आमदार अशोक जांभळे लढत होते. माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांनी जांभळे यांच्यामागे आपली ताकद लावली होती. सतेज पाटील यांच्या मागणी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आपली ताकद लावली होती. यामध्ये प्रचंड वादही झाला होता. ही निवडणूकही सतेज पाटील यांनी जिंकली. जिल्हा बॅंकेच्या 2014 मध्ये राजकारणातून बाहेर पडले होते. त्यानंतर आता तिसऱ्यांदा संचालक पदाच्या रेसमध्ये असताना पी. जी. शिंदे यांनी माघार घेतल्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.