जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी बंटी पाटलांचा प्लॅन ठरला

जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि पंचायत समिती (Panchayat Samiti) निवडणुकांसाठी काँग्रेसची रणनीती ठरली आहे.
Satej Patil News Updates | Satej Patil Latest News Updates
Satej Patil News Updates | Satej Patil Latest News UpdatesSarkarnama

कोल्हापूर : जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि पंचायत समिती (Panchayat Samiti) निवडणुकांसाठी काँग्रेसची रणनीती ठरली आहे. पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी या निवडणुकांसाठी जोरदार तयारी केली असून, काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्लॅन आखण्यात आला आहे. काँग्रेस काही ठिकाणी स्वबळावर तर काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांना विश्‍वासात घेऊन निवडणूक लढवणार आहे. (Satej Patil News Updates)

काँग्रेस (Congress) कमिटीत डिजिटल सभासद नोंदणीसाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठक झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आवाहन सतेज पाटील (Satej Patil) यांनी केले. प्रत्येक तालुक्‍यात १०० टक्के डिजिटल सभासद नोंदणी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. काँग्रेसचे सर्वच उमेदवार निवडून यावेत, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. काही ठिकाणी आपण स्वबळावर तर काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांसोबत निवडणुका लढवणार आहोत, असे पाटील यांनी स्पष्ट केले. या वेळी आमदार ऋृतुराज पाटील, आमदार राजू आवळे, गुलाबराव घोरपडे, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, गोकुळचे संचालक बयाजी शेळके आदी उपस्थित होते.

Satej Patil News Updates | Satej Patil Latest News Updates
भाजपला मोठा धक्का! अधिवेशन काळासाठी तीन आमदारांचं निलंबन

पाटील म्हणाले की, आमदार ऋतुराज पाटील, प्रकाश पाटील, शशिकांत खोत यांच्यावर दक्षिण मतदारसंघाची जबाबदारी आहे. हातकणंगले तालुक्‍यातील १२ मतदारसंघांत काँग्रेसचे सदस्य व्हायला हवेत. डिजिटल सभासद नोंदणीच्या सूचना दिल्या आहेत. गगनबावडा तालुक्‍यात जिल्हा परिषदेचे दोन गट आहेत. प्रत्येक बूथवर पाच प्रतिनिधी नियुक्त करावे लागतील. इचलकरंजीत जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्‍न सोडवण्यात येतील. इचलकरंजीतून राष्ट्रवादी काँग्रेसकडून हसन मुश्रीफ व शिवसेनेकडून अरुण दुधवडकर नावे देतील.

Satej Patil News Updates | Satej Patil Latest News Updates
शेअर बाजाराच्या माजी प्रमुखांचा पाय खोलात; सीबीआय कोठडीची हवा खावी लागली

काँग्रेसच्या डिजिटल सभासद नोंदणीसाठी एक महिन्यात जिल्ह्यातील सर्व समित्यांच्या नियुक्त्या कराव्यात. यानुसार पक्ष वाढीसाठी नवीन सभासदांची नोंदणी करुन पुढाकार घ्यावा. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच सभासद नोंदणी पूर्ण करा. जिल्हा परिषदेसाठी प्रारूप आराखडा तयार होऊन अंतिम आरक्षण लवकरच जाहीर होणार आहे. यासाठी काही महिन्यांचा वेळ असला तरी कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये. काँग्रेसला बळकट करण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांची एकजूट करण्यासोबत नवीन सदस्यांची नोंदणी आवश्यक आहे. काँग्रेसची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोचायला हवीत, असे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com