"...तेव्हा मला बोलवा, पाच मिनिटांत तिथं येतो; बंटी पाटलांच दांडकं अजून घट्ट आहे"

Satej Patil | Congress | Kolhapur : सतेज पाटील यांचा विरोधकांना गर्भित इशारा
"...तेव्हा मला बोलवा, पाच मिनिटांत तिथं येतो; बंटी पाटलांच दांडकं अजून घट्ट आहे"
Satej Patil Latest Marathi News, Bunty Patil NewsKolhapur

कोल्हापूर : विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी दडपशाही करण्याचा प्रयत्न केला, तरीही भागातील मतदारांनी त्याला भीक घातली नाही. त्यामुळे मतदान करायला घाबरला नाहीत, आता विकासकामे करायला घाबरू नका. विकासकामांचे नारळ फोडताना कोणी दडपशाही करायला लागला, गुंडगिरी करायला लागला, तर मला बोलवा. पाच मिनिटांत तिथं येतो, बंटी पाटलांचं दांडकं अजून घट्ट आहे, अशा शब्दात कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. (Satej Patil Latest Marathi News)

कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांच्या विजयानंतर कदमवाडी येथील विठ्ठल चौकात सतेज पाटील यांचा जाहीर सत्कार करून विजयी सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

Satej Patil Latest Marathi News, Bunty Patil News
शिवसेनाची जागा आता मनसे घेणार? NDA विस्तारासाठी भाजपचा रोडमॅप ठरला!

यावेळी सतेज पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत कपूर वसाहतीची जागा बळकावण्याचा प्रयत्न असल्याच्या आरोपालाही प्रत्यूत्तर दिले. ते म्हणाले, काही भंपक माणसांनी प्रचारादरम्यान कपूर वसाहतीची जागा बळकावण्याचा सतेज पाटील यांचा प्रयत्न असल्याचा अपप्रचार केला. पण जागा बळकवायला मी काही महाडिक नाही. हीच कपूर वसाहत मी झोपडपट्टीधारकांच्या नावावर करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Satej Patil Latest Marathi News, Bunty Patil News
काँग्रेस-वंचितची गुप्त खलबत! आगामी पालिका-ZP निवडणुकीत नवीन समिकरण?

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कदमवाडी परिसरातील सर्व प्रश्न सोडविल्याशिवाय महानगरपालिकेला मतं मागायला येणार नाही, असा शब्द यावेळी दिला. तसेच कोल्हापूरकरांचे थेट पाईपलाईनचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत. टीकाकार कितीही टीका करू देत, पण आम्ही कोल्हापुरकरांना यंदाच्या दिवाळीतील पहिली आंघोळ ही थेट पाईपलाईनच्या पाण्यानेच घालणार आहोत. यावेळी आमदार जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, भीमराव पोवार, राजू लाटकर, भारती पोवार यांची भाषणे झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.