
Commissioner of Kolhapur : कोल्हापूर महापालिकेला नवीन आयुक्त मिळाला हे ऐकून कोल्हापूरकरांचा आनंद गगनात मावत नव्हता. कारण कोल्हापूरच्या सर्व नागरी कृतीसमितीने सत्ताधारी आमदार व खासदार यांच्या घरासमोर बोंब मारायची तारीख ठरवली होती. पण आजच आयुक्त मिळाले, अन् यावर पाणी फिरलं. पण माजी पालकमंत्री सतेज पाटील यांना ऐकीव बातम्या आणि व्हायरल पोस्टवर अजिबात विश्वास बसला नाही. कारण त्यांच्यासाठी हा सुखद धक्का होता.
महापालिकेची मुदत संपल्याने गेल्या अडीच वर्षांपासून कोल्हापूरला नगरसेवक नाही. महापालिकेवर प्रशासकराज सुरु आहे. त्यात गेली अडीच महिने कोल्हापूर महापालिकेत आयुक्तही नसल्यामुळे कोल्हापूरकरांचे चांगलेच हाल झाले. त्यावर माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी देखील आवाज उठवला. पण भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांच्या मर्जीतील आयुक्त हवा, म्हणून हे घोंगडे गेले अडीच महिने भिजत ठेवले होते. तसा आरोपही आमदार सतेज पाटील यांनी केला होता.
सतेज पाटील यांनी फेसबुकवर प्रतिक्रिया देत राज्य सरकारचे आभार मानले आहेत. " कोल्हापूर महानगरपालिकेस आयुक्त मिळाल्याची माहिती व्हाट्सएप्प वरून मिळाली. पण ऑर्डर बघितल्यावर खात्री पटली. कारण गेले अनेक दिवस आयुक्त नेमणुकीच्या केवळ अफवाच येत होत्या. "निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान" असे ब्रीद असणाऱ्या सरकारकडून ९० दिवसांनंतर का असेना पण कोल्हापूर महानगरपालिकेस आयुक्त देण्यासाठी सवड मिळाली, याबद्दल राज्य सरकारचे हार्दिक आभार! " असं म्हटलं आहे.
त्यावर पालकमंत्री दीपक केसरकरांनी चार दिवसात आयुक्त देतो असल्याचे सांगून निघून गेले त्यानंतर ते इकडे फिरकलेच नाहीत. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारही आले. 15 ऑगस्टला त्यांनी चार दिवसात आयुक्त देण्याचे आश्वासन दिले. कोल्हापुरकरांनी भाबडी अशा ठेवली, पण आयुक्त काही मिळाले नाहीत.
आम आदमी पार्टीने, 'दादा! मुंबईत पोचलासा काय?' असा फलक लावून पुन्हा त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. तरीही आयुक्त काही आले नाहीत. या संपूर्ण प्रकारमुळे सरकारवरचा विश्वास उडल्याची भावना निर्माण झाली होती.
अखेर आज सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांची कोल्हापुरला आयुक्तपदी वर्णी लागली. तशी बातमीदेखील समाजमाध्यमातून व्हायरल झाली. ही माहिती माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनाही मिळाली. पण त्यावर विश्वास ठेवायचा कसा? असा प्रश्न त्यांना पडला. म्हणून या बातमीची खात्री त्यांनी केली. त्याबाबतचा आदेश पाहूनच त्यांना विश्वास बसला. त्यांनीही ही बातमी बघून सुटकेचा निश्वास सोडला.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.