सातारा युवक काँग्रेस : जिल्हाध्यक्षपदी अमरजित कांबळे, अमित जाधव कार्याध्यक्ष

माजी मुख्यमंत्री Ex CM पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांच्या नेतृत्वाखाली व युवक काँग्रेसचे Youth Congress प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे Shivraj More यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी पार पडल्या.
सातारा युवक काँग्रेस : जिल्हाध्यक्षपदी अमरजित कांबळे, अमित जाधव कार्याध्यक्ष
Amarjit Kambale, Amit Jadhavkarad reporter

कऱ्हाड : सातारा जिल्हा युवक काँग्रेस व विधानसभा कार्यकारिणी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात खटावचे अमरजित कांबळे सहा हजार २३४ मते मिळवून अध्यक्षपदी तर कऱ्हाडचे अमित जाधव १६ हजाप ८९५ मते मिळवून कार्याध्यक्षपदी विजयी झाले. अध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होते, त्या जागी अमरजित कांबळे याची अध्यक्षपदी तर अमित जाधव यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाली.

या निवडणुका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या कल्पनेतून सन २०१० पासून विद्यार्थी काँग्रेस (एन.एस.यु.आय) व युवक काँग्रेस मध्ये सामान्यांना पदे मिळावीत व नवीन नेतृत्व घडवण्याची संधी मिळावी या दृष्टिकोनातून दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. या निवडणुकीत जिल्हा कार्यकारिणीसाठी एकूण २४ उमेदवार उभे होते.

Amarjit Kambale, Amit Jadhav
रोहिदास दाजींचा वारसा... स्वप्नील पाटील चौथ्यांदा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी!

मिळालेल्या मतांनुसार प्राधान्यक्रमाने अन्य उमेदवार उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस म्हणून विजयी झाले. जिल्हा कार्यकारिणीत महिला, इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अल्पसंख्याक प्रवर्गांना आरक्षण दिले गेले होते. जिल्हा कार्यकारिणीसाठी संपूर्ण जिल्ह्यातील १८ ते ३५ वयोगटातील एकूण ६२ हजार ३४५ युवकांनी मतदान केले. त्यापैकी ५० हजार ६३४ मते वैध ठरली. अन्य मतदारांची मते आधारकार्ड, फोटो यामध्ये त्रुटी असल्याने अवैध ठरली. जिल्हा कार्यकारिणी सोबत विधानसभा मतदारसंघनिहाय निवडी जाहीर झाल्या.

Amarjit Kambale, Amit Jadhav
Video : पृथ्वीराज चव्हाण हे कोणतेही आकडे शोधून आणतात : देवेंद्र फडणवीस

जिल्हा कार्यकारिणी अशी ः अध्यक्ष - अमरजित कांबळे , कार्याध्यक्ष - अमित जाधव, महिला उपाध्यक्षा - सौ. निलम येडगे, उपाध्यक्ष - विहार पावसकर, सागर सावंत, समीर पटवेकर, सरचिटणीस - प्रशांत पवार, गंगाराम रणदिवे, प्राची ताकतोडे, प्रमोद माने, अभिजित चव्हाण, देवदास माने, रोहित पाटील, प्रेरणा काशीद, अमोल नलवडे, सुरज कीर्तिकर, सचिव- अजित पवार, राहुल फडतरे, सचिन घाडगे, दिग्विजय वाघमारे, राहुल रासकर, सचिन गोरड, महेश देसाई, जयेश चव्हाण आदी विजयी झाले आहेत.

Amarjit Kambale, Amit Jadhav
कराड दक्षिणेत पृथ्वीराज चव्हाणांसाठी धोक्याची घंटा...

विधानसभा मतदारसंघनिहाय निवडी अशा ः कऱ्हाड दक्षिण - अध्यक्ष - दिग्विजय पाटील, राम मोहिते (उपाध्यक्ष). कराड उत्तर - अध्यक्ष - सुरज पवार , प्रवीण वेताळ ( कार्याध्यक्ष) पाटण - अध्यक्ष - नरेंद्र पाटणकर, प्रथमेश पाटील (उपाध्यक्ष). सातारा - अध्यक्ष - विक्रांतसिंह चव्हाण, अमोल शिंदे व सुयोग गोरे (उपाध्यक्ष), कोरेगाव - अध्यक्ष - दत्तात्रय भोसले (अध्यक्ष), सागर साळुंखे (उपाध्यक्ष), माण-खटाव - अध्यक्ष - ॲड. संदीप सजगणे (अध्यक्ष), पंकज पोळ (उपाध्यक्ष), वाई - अध्यक्ष - सचिन काटे (अध्यक्ष), ऋषिकेष धायगुडे-पाटील (उपाध्यक्ष), फलटण - अध्यक्ष - अजिंक्य कदम ( अध्यक्ष ).

Amarjit Kambale, Amit Jadhav
दोन्ही राजे आमचेच...सातारा पालिकेचा निर्णय फडणवीस घेतील...

प्रदेशाध्यक्ष पदासाठी चुरस

महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी चुरस वाढली आहे. मंत्रिपुत्र कुणाल राऊत, माजी मंत्रिपुत्र शरण पाटील, कऱ्हाडचे शिवराज मोरे यांच्यापैकी एकाची निवड होणार आहे. त्यासाठी राहुल गांधी मुलाखत घेऊन ठरवणार आहेत. आगामी आठवड्यात दिल्लीतून होणार निर्णय आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in