Satara : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला कायम राखणार... श्रीनिवास पाटील

MP Srinivas Patil खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, मेणवली येथे पर्यटन विकासाला मोठा वाव आहे.
MP Srinivas Patil
MP Srinivas Patilsarkarnama

Wai News : जनतेच्या अडचणी सोडविणे, राज्याच्या प्रगतीच्या योजना राबविण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे. साताऱ्याचा खासदार होण्याचा आनंद वेगळा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा NCP बालेकिल्ला कायम राखूया, असे आवाहन सातारचे खासदार श्रीनिवास पाटील Srinivas Patil यांनी केले.

मेणवली (ता.वाई) येथे १ कोटी ८६ लाख रुपये खर्चाच्या जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना, पर्यटन निधी व आमदार विकास निधीतून ५० लाख ५० हजार रुपये खर्चाच्या रस्ते डांबरीकरण, सभामंडपाच्या भूमिपूजन, उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस प्रतापराव पवार अध्यक्षस्थानी होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, किसन वीरचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, दिलीप पिसाळ, शशिकांत पवार, विक्रांत डोंगरे, मोहन जाधव, शंकरराव शिंदे, मनीषा गाढवे, रवींद्र मांढरे, प्रल्हाद गाढवे, मदन भोसले, आनंद चिरगुटे आदी उपस्थित होते.

MP Srinivas Patil
Satara : देशाला सशक्त, समृध्द करणारा अर्थसंकल्प : उदयनराजे

खासदार पाटील म्हणाले, मेणवली येथे पर्यटन विकासाला मोठा वाव आहे. आमदार मकरंद पाटील व आपण त्याकामी मदतीचा हात देऊ. आमदार पाटील यांनी प्रत्येक निवडणुकीत या गणातून पक्षाला मोठे मताधिक्य मिळाल्यामुळे जनतेच्या अडचणी सोडविणे, विकास कामांना निधी देणे, हे कर्तव्यच आहे. रस्ते, पिण्याच्या पाणी योजनांच्या अंमलबजावणीसाठी आम्ही धोरण घेऊन काम करतो. राज्य सरकारच्या पाणंद विकास योजनेतून रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

MP Srinivas Patil
Satara : अदानी प्रकरणाची आरबीआय, सेबीमार्फत चौकशी करावी : पृथ्वीराज चव्हाण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com