Satara : एसपींची धडाकेबाज कारवाई; बकासुर गँगमधील सात जणांना केले तडीपार

पोलिस अधीक्षक SP अजय कुमार बन्सल Ajay Kumar Bansal यांची जिल्हयाचा कार्यभार स्विकारल्यापासुन ४८ प्रस्तावातील बेकायदेशीर कारवाया करणारे ९४६ इसमांना हद्दपारीचे आदेश Order of Deportation केलेले आहेत.
Satara SP Ajay kumar Bansal
Satara SP Ajay kumar Bansalsarkarnama

सातारा : सातारा शहरातील शाहुपुरी, सातारा शहर आणि सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदा शस्त्र बाळगुन दरोडा टाकणे, जबरी चोरी, गंभीर दुखापत, अवैध शस्त्रांचा वापर करुन धमकावणे, गर्दी मारामारी करणाऱ्या बकासूर गँगमधील सात जणांना आज सातारचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी जिल्हा हद्दीतून एक वर्षासाठी तडीपार केले आहे.

याबाबतची माहिती सातारा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहरात गेली अनेक दिवसांपासून बकासूर गँगच्या माध्यमातून युवकांची टोळी दहशत माजवत होती. या टोळीने शाहुपुरी, सातारा शहर, सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदा शस्त्र बाळगुन दरोडा टाकणे, जबरी चोरी, गंभीर दुखापत, अनाधिकाराने प्रवेश करुन मारहाण करणे, अवैध शस्त्रांचा वापर करुन धमकावणे, गर्दी मारामारी, मटका, जुगार चालविणे, असे गंभीर गुन्हे ही टोळी करत होती.

Satara SP Ajay kumar Bansal
तिहेरी हत्याकांडाने सातारा हादरला; अनैतिक संबंधांच्या संशयावरून प्रियकराचे कृत्य

सातारा टोळीतील युवकांविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी. बी. निंबाळकर यांनी हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे सादर केला होता. याची चौकशी व सुनावणी होऊन या टोळीस पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये पूर्ण सातारा जिल्हातून एक वर्षासाठी हद्दपारीचा आदेश दिला आहे.

Satara SP Ajay kumar Bansal
उत्कृष्ट जिल्हा कौशल्य विकास आराखडा पुरस्कार सातारा जिल्ह्याला जाहीर

यामध्ये बकासूर गँगचा प्रमुख यश नरेश जांभळे (वय-२१ रा. झेडपी कॉलनी, शाहुपूरी), टोळी सदस्य : आदित्य जयेंद्र गोसावी (वय- २१, रा. ६६ शुक्रवारपेठ सातारा), विशाल राजेंद्र सावंत (वय २०, ५०१, मंगळवारपेठ, सातारा), साहिल जमीर जमादार (वय २१, रा.२५२, बुधवारपेठ, सातारा), ऋतिक ऊर्फ विजय विनोद कांबळे (वय २३, रा.२६३, बुधवारनाका, सातारा), प्रज्वल प्रविण गायकवाड (वय २४, रा. अंजली कॉलनी, शाहुपूरी), शिवम संतोष पुरीगोसावी (वय १८, रा. गडकरआळी, गोसावीवाडा, सातारा) यांचा समावेश आहे.

Satara SP Ajay kumar Bansal
सोलापुरात ‘एसपी’ सातपुतेंचे ‘ऑपरेशन परिवर्तन’; दारू काढणाऱ्या महिला शिवणार आता ‘ब्रँडेड शर्ट’

या टोळीतील युवकांना वेळोवेळी सुधारण्याची संधी देवुनही त्यांचे वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव सुरूच होता. जनतेमधुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यामुळे सातारा जिल्हा हद्दीत हिंसक घटना घडुन भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणुन त्यांच्यावर ही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचे सर्व स्थरातुन समाधान व्यक्त होत आहे.

Satara SP Ajay kumar Bansal
राज्य ATS ला एसपी मिळेना; डीजीपी पांडेंवर आलीय आवाहन करण्याची वेळ

आतापर्यंत ९४६ तडीपार....

पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची जिल्हयाचा कार्यभार स्विकारल्यापासुन ४८ प्रस्तावातील बेकायदेशीर कारवाया करणारे ९४६ इसमांना हद्दपारीचे आदेश केलेले आहेत. या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाचे वतीने अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बो-हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलिस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोलिस नाईक प्रमोद सावंत, केतन शिंदे, अनुराधा सणस यांनी योग्य पुरावे सादर केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in