Satara Politics : कार्यकर्त्यांनी आग्रह केला अन् महेश शिंदे....

कोरेगाव मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार महेश शिंदे यांच्या गटांने जोरदार मुसंडी मारली आहे
MLA Mahesh Shinde| Satara Politics
MLA Mahesh Shinde| Satara Politics Sarkarnama

Satara Politics : कोरेगाव मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार महेश शिंदे यांच्या गटांने जोरदार मुसंडी मारली आहे. या विजयाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयी मेळावा घेऊन आमदार महेश शिंदे यांची घोड्यावरून मिरवणूक काढली.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमदार महेश शिंदे गटाने जोरदार मुसंडी मारत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत अनेक ग्रामपंचायतींवर झेंडा रोवलाय. आमदार महेश शिंदे यांच्या समर्थकांचा कार्यकर्ता मेळावा सातारा रोड येथील एका मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.. यावेळी आमदारांच्या कार्यकर्त्यांनी आमदार महेश शिंदे यांना घोड्यावर बसवून गाण्याच्या तालावर वाजतगाजत मिरवणूक काढली.

MLA Mahesh Shinde| Satara Politics
Jaykumar gore : स्वतः जखमी असतानाही आमदार गोरेंनी केली आपल्या जखमी सहकाऱ्यांना मदत

या मिरवणुकीत आमदार महेश शिंदे यांनी देखील कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर घोड्यावर बसून गाण्यावर ठेका धरला. आमदार महेश शिंदे यांच्या कार्यकर्त्याने आपला महेश दादा हे गीत तयार केलं आहे. कोरेगाव मतदारसंघातील सर्व नवनियुक्त सरपंच आणि सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

दरम्यान, २० डिसेंबर २०२२ रोजी राज्यातील साडेसात हजार ग्रामपंचायतींचेय निकाल जाहीर झाले. यात साताऱ्यातील कोरेगाव मध्ये शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) आणि आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांच्यात नियमीत वर्चस्वाचा सामना असतो. त्यामध्ये शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी बाजी मारली. कोरेगाव तालुक्यात ५१ पैकी ३४ जागांवर आमदार महेश शिदेंच्या गटाचा मोठा विजय झाला आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com