Satara News : भाजपच्या माजी आमदारांच्या बंगल्याच्या परिसरात आढळला मृतदेह!

Satara News : ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
Satara News
Satara News Sarkarnama

सातारा : सातारा (Satara) तालुक्यातील वाढे येथील ऑइल मिल परिसरातील भाजपच्या माजी आमदार कांताताई नलावडे (kantatai Nalawade) यांच्या बंगल्याच्या आवारात अर्धवट पुरलेल्या स्थितीतील अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे साताऱ्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस वैद्यकीय पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून, पंचनामा करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. माजी आमदार कांताताई नलवडे यांच्या या बंगल्यात गेल्या दोन वर्षांपासून कोणीही राहत नसल्याचे सांगण्यात आले आहे.

याबाबतची प्राथमिक माहिती अशी की, ऑइल मिल परिसरात गेल्या काही महिन्यापासून नलावडे यांचा बंगला बंद अवस्थेत आहे. परिसर निर्जन असल्याने तिकडे कोणाची ये-जा नसते. शुक्रवारी दुपारी काही जणांना उग्र वास आल्याने त्यांनी जाऊन पाहिले असता, अर्धवट पुरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती सातारा तालुक्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना समजली, त्यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

Satara News
Pune : माधुरी मिसाळ यांची लक्षवेधी अन् फडणवीसांची मोठी घोषणा; झोपडपट्टी विकासाला मिळणार...

घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली, त्यामुळे तातडीने वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आले. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी बंगला मालकांशी संपर्क साधल्यानंतर देखरेख करण्यासाठी दोघेजण असल्याचे समोर आले आहे. मात्र संबंधितांचा फोन बंद येत आहे. पोलिसांनी या दृष्टीने अधिक माहिती घेऊन तपास सुरू केला आहे. घटनास्थळी मृतदेहाचे पोस्टमार्टम झाल्यानंतर, आढळून आलेला मृतदेह पुरुषाचा का महिलेचा हे समोर येणार आहे.

Satara News
Urfi Javed Contraversy : चित्रा वाघ यांच्यावर उर्फीचा जोरदार पलटवार : म्हणाली, तुमच्या सारख्या राजकारण्यांनी..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in