Satara News: पालिका इमारतीसाठी उत्खनन केलेले गौण खनिज परस्पर विकले; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल

Udayanraje Bhosale: संधी साधू लोकांनी उदयनराजे यांच्या विश्वासाचा फायदा उठवून त्यांचे त्यांच्या राजकारणाचे आणि पर्यायाने सातारा जनतेचे मोठे नुकसान केले आहे, असेही सुशांत मोरे यांनी म्हटले आहे.
Satara Palika New Building Site
Satara Palika New Building Sitesarkarnama

Satara News : सदरबझार येथे सातारा पालिकेच्या (Satara Palika) नूतन प्रशासकीय इमारतीचे काम सुरू असून या कामानिमित्त ठेकेदार टी. अँड टी. कंपनीने उत्खनन केलेले गौण खनिज संबंधित कंपनीने परस्पर विकल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केला आहे. या कंपनीवर व तो विकत घेणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित कंपनीकडून रॉयल्टी वसूल करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

ज्यादा उत्खनन केलेल्या दगडाची रॉयल्टी शासनाला भरण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र देखील सुशांत मोरे यांनी सातारा नगरपालिकेला सादर केले आहे. यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकांत मोरे यांनी म्हटले की, टी अँड टी कंपनीने प्रशासकीय इमारतीचे उत्खनन करताना त्याचे गौण खनिज एका ठेकेदाराला विकले असून कंपनीने फसवणूक करून हा दगड त्यांना दिला आहे. मोठ्या प्रमाणात तो दगड बाजारात विकला गेला आहे.

कोट्यवधीची रॉयल्टी बुडवून सरकारचे नुकसान करण्यात आले आहे .सातारा नगर परिषदेने या प्रकरणाची गंभीर दखल घेणे गरजेचे होते .टीएनटी कंपनी सध्या सातारा नगर परिषदेची मालकी आहे काही केले तरी आपल्याला काही दंड होत नाही, अशा भावनेने ही कंपनी काम करत आहे. एवढ्या मोठ्या दगडाचा काळा व्यवहार कोणाच्याही लक्षात आला नसल्याचे पत्रकात नमूद केले आहे.

Satara Palika New Building Site
Satara News : शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश; विकासकामांना १२ कोटी ६४ लाखांचा निधी मंजूर

संधी साधू लोकांपासून तसेच ठेकेदारांपासून सावध राहावे, अशी अपेक्षा सुशांत मोरे यांनी व्यक्त केली आहे. संधी साधू लोकांनी उदयनराजे यांच्या विश्वासाचा फायदा उठवून त्यांचे त्यांच्या राजकारणाचे आणि पर्यायाने सातारा जनतेचे मोठे नुकसान केले आहे. काही महाभाग या विश्वासाचा फायदा घेतात आणि बदनामी उदयनराजे यांची होते . तुम्ही कायम ठोकून काढण्याची भाषा बोलता, असे संधी साधू ठोकून काढा व सातारच्या जनतेला आम्ही कोणालाही पाठीशी घालत नाही हे दाखवून द्या, अशी मागणी सुशांत मोरे यांनी केली आहे.

Satara Palika New Building Site
Satara News : सातारा मेडिकल कॉलेजमधील भंगार विक्रीचा मुद्दा विधानपरिषदेत; आता होणार चौकशी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com