सातारा पालिकेची निवडणूक भाजप पूर्ण ताकदीनिशी लढणार...

फक्त पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करावे. तिकीट मिळाले तर निवडून येण्यासाठी प्रयत्न करावेत. तिकीट मिळाले नाहीतर पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली आहे, त्यांच्या मागे ठामपणे उभे राहावे, असे आवाहन विक्रम पावसकर यांनी केले.
Satara Palika
Satara Palika karad

सातारा : भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सातारा नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कामाला सुरवात केली आहे. सातारा शहरातील सर्व 131 बुथवर बूथ कमिटी पूर्ण आहेत, त्यांचे काम चालू आहे. त्यामुळे सातारा नगरपालिका निवडणूक भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकतीने लढेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी व्यक्त केला.

सातारा शहरातील आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा शहरातील भारतीय जनता पार्टीने प्रत्येक वार्डसाठी एका प्रभारीची नियुक्ती केली आहे. या प्रभारींनी आपल्या वॉर्डचा पूर्ण अभ्यास करून भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यकारिणीकडे अहवाल सादर करायचा आहे. वॉर्ड प्रभारींची बैठक 17 ऑक्‍टोबर रोजी सातारा शहरात पार पडली. या बैठकीत बोलताना शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी सातारा शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कामाचा आढावा घेतला. तसेच 2014 पासून आजपर्यंत ज्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या मतांची टक्केवारीत वाढ झाली, असे सांगितले.

Satara Palika
सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हे न पटणारे; भाजप पालिका स्वबळावर लढणार 

त्याचप्रमाणे 2016 च्या निवडणुकीत 31 ठिकाणी उमेदवार उभे केले आणि नऊ ठिकाणी उमेदवार मिळाले नव्हते. परंतु आताची परिस्थिती खूपच चांगली आहे. आपल्याला सर्व प्रभागात सर्व वार्डात सर्व कॅटेगिरीचे उमेदवार मिळतील, अशी खात्री व्यक्त केली. तसेच कमळ या चिन्हावरच निवडणूक लढवावी अशी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावना सांगितली. त्याचप्रमाणे कोरोनाच्या महामारीमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी केलेले काम लक्षात घेऊन सर्वसामान्य जनतेची हीच अपेक्षा असल्याचे सांगितले.

Satara Palika
उदयनराजे, तुम्ही लोळत जावा किंवा चालत; पण सातारा पालिकेला लोळवू नका....

यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित कुलकर्णी यांनी सातारा शहरातील कार्यकर्ते चांगले काम करत असून भाजपाचे कमळ हे चिन्ह घराघरात पोचवण्याचे आवाहन सर्व कार्यकर्त्यांना केले. भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित काम करण्याचे आव्हान केले आणि भाजपच्या महिला उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Satara Palika
उदयनराजेंनी केली सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

विक्रम पावसकर म्हणाले, सातारा शहरात भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रकारचे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवले जातात. सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित असतात. साताऱ्यातील परिस्थिती खूप चांगली असल्याचे प्रदेशाध्यक्षांनी हे मान्य केले आहे. आपण सर्वांनी मिळून काम केले तर आपल्याला काहीच अवघड नाही. फक्त पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करावे. तिकीट मिळाले तर निवडून येण्यासाठी प्रयत्न करावेत. तिकीट मिळाले नाहीतर पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली आहे, त्यांच्या मागे ठामपणे उभे राहावे. लवकरच या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीची नेमणूक केली जाईल, साताऱ्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भावना प्रदेशला कळविल्या जातील. परंतु भारतीय जनता पार्टी सातारा शहर नगरपालिका निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढेल, यावर सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी काम करावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com