Satara : मेडिकल कॉलेजच्या भंगार चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Satara Medical college मेडिकल कॉलेजच्या इमारतीच्या बांधकामादरम्यान पाटबंधारे विभागाच्या जुन्या इमारती पाडण्याचे काम सुरू झाले. त्या इमारतीतील भंगार शासकीय निविदा न काढताच परस्पर विकल्याची घटना घडली.
Satara Medical College
Satara Medical Collegesarkarnama

Satara News : सातारा Satara येथील मेडिकल कॉलेजच्या Medical College भंगार चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सातारचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी मेडिकल कॉलेजचे डीन यांना दिले आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश उबाळे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. तर आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांनी विधिमंडळात आवाज उठवला होता. आता सातारा शहर पोलीस ठाण्यात भंगार चोरीचा नेमका कोणावर गुन्हा दाखल होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सातारा शहरात शासकीय मेडिकल कॉलेजचे काम नुकतेच सुरू झाले आहे. मेडिकल कॉलेजच्या इमारतीच्या बांधकामादरम्यान पाटबंधारे विभागाच्या जुन्या इमारती पाडण्याचे काम सुरू झाले. त्या इमारतीतील भंगार शासकीय निविदा न काढताच परस्पर विकल्याची घटना घडली. या भंगाराची चोरी झाल्याची घटना उघडकीस येताच राष्ट्रवादीचे नेते रमेश उबाळे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले होते.

या आंदोलनस्थळी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे व शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी भेट दिली होती. आमदार शशिकांत शिंदे यांनी विधिमंडळात आवाज उठवून याबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करावेत अशी मागणी केली होती. तर आमदार महेश शिंदे यांनीही याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, तसेच पहिल्या ४५ इमारती पाडल्यानंतर त्यातील भंगार कोणी चोरले याचाही शोध घ्यावा, अशी मागणी केली होती.

Satara Medical College
Satara News: पालिका इमारतीसाठी उत्खनन केलेले गौण खनिज परस्पर विकले; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल

त्यानंतरही काहीही हालचाल न झाल्याने राष्ट्रवादीचे नेते रमेश उबाळे यांनी प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. तत्पूर्वी सातारचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी मंगळवारी मेडिकल कॉलेजचे डीन यांना भंगार चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सातारा शहर पोलीस ठाण्यात नेमका कोणावर भंगार चोरीचा गुन्हा दाखल होणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

Satara Medical College
Satara News : सातारा मेडिकल कॉलेजमधील भंगार विक्रीचा मुद्दा विधानपरिषदेत; आता होणार चौकशी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com