माझ्या पराभवासाठी शिवेंद्रसिंहराजे जबाबदार ; हे त्यांचेच षडयंत्र आहे : शशिकांत शिंदे
Shashikant Shinde, Shivendra Rajesarkarnama

माझ्या पराभवासाठी शिवेंद्रसिंहराजे जबाबदार ; हे त्यांचेच षडयंत्र आहे : शशिकांत शिंदे

आमदार शिंदे (MLA Shashikant Shinde) म्हणाले, ''शिवेंद्रसिंहराजे (Shivendra Raje) विषयी पक्षाने भूमिका जाहीर करावी, मी सरळपणाने निवडणूक लढवली, कोणतीही दादागिरी केली नाही.

सातारा : ''सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje) यांच्यामुळे माझा पराभव झाला,'' असा गौप्यस्फोट आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी केला. 'हे त्यांचेच षडयंत्र आहे,' असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा बँकेतील पराभवानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी आज सातारा शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. आपली भूमिका जाहीर केली, यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली.

एकाच दिवसात सगळे अर्ज निघाले आणि हे बिनविरोध कसे झाले हे शोधले पाहिजे, असे शिंदे म्हणाले. आमदार शिंदे म्हणाले, ''शिवेंद्रसिंहराजे विषयी पक्षाने भूमिका जाहीर करावी, मी सरळपणाने निवडणूक लढवली, कोणतीही दादागिरी केली नाही. सातारा विधानसभा लढविणार का, या प्रश्नावर मी सध्या विधान परिषदेवर आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादीचे 9 आमदार कसे होतील यासाठी प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकीत पक्षाचा बालेकिल्ला अभेद्य राहावा यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निर्णय घ्यावा,''

Shashikant Shinde, Shivendra Raje
उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशी रद्द

''जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जे राजकारण झाले ते यापुढील निवडणुकीत होऊ नये, याची काळजी घेतली जावी. जे लोक विरोधात काम करतात ते सहकार पॅनेलमध्ये कसे आणि तेच बिनविरोध झाले पण आम्ही प्रामाणिक काम करूनही ताकत असूनही पराभूत होतो यामागे पक्षातील नेत्यांचे षडयंत्र आहे,'' असे ही त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in