नेत्यांनी निवडणुकीत राजकारण केले; पण, मी बँकेवर पुन्हा येणार...

जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना सध्याच्या विरोधी पक्षाकडून BJP आमदारकीसाठी MLA पक्षाचे तिकीट देण्याचे ऑफर आली होती. परंतु, अनेक नेते कार्यकर्ते पक्ष बदलत असताना मी जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाशी एकनिष्ठ राहून निष्ठेने काम केले.
Sunil Mane
Sunil ManeImran shaikh, Rahimatpur reporter

रहिमतपूर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी राजकारण झाल्याने शेवटच्या क्षणी पक्षाकडून मला अर्ज मागे घेण्यास सांगितले. पक्षावर असलेल्या विश्वासाने मी क्षणाचाही विचार न करता अर्ज मागे घेतला. पण, माझ्यावर राजकारण करून जरी कोणी मला दाबण्याचा प्रयत्न करत असेल, तर मी त्यांना सांगू इच्छितो, कार्यकर्त्याच्या ताकतीवर मी पुन्हा जिल्हा बँकेवर पुन्हा स्वाभिमानाने येणार आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी व्यक्त केले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना माघार घ्यावी लागल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता निर्माण झाली असून त्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी रहिमतपूर येथे त्यांनी रात्री कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी नगराध्यक्ष आनंदा कोरे, वासुदेव माने, अविनाश माने, बेदील माने, नंदकुमार माने, चांदगणी आतार, विकास तूपे आदी उपस्थित होते. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत सुनील माने यांच्याविषयी आदर व्यक्त केजर, तसेव त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची निंदा केली. त्याचबरोबर सुनील माने घेतील त्या निर्णयाबरोबरच राहण्याची ग्वाही कार्यकर्त्यांनी दिली.

Sunil Mane
जिल्हा बँकेत डावलूनही सुनील माने म्हणतात, मी चुकीची भूमिका घेणार नाही...

सुनील माने म्हणाले, ''राजकारणामध्ये नवीन संधी निर्माण करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. माझी जनता हीच माझी संधी आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना सध्याच्या विरोधी पक्षाकडून आमदारकीसाठी पक्षाचे तिकीट देण्याचे ऑफर आली होती. परंतु, अनेक नेते कार्यकर्ते सत्तेच्या लालसेपोटी पक्ष बदलत असताना मी जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षांमध्ये स्थिरता आणण्याबरोबरच पक्ष वाढवण्याचे काम प्रामाणिकपणे, निष्ठेने केले. १९९९ पासून आजपर्यंत पक्षाचे नाव खाली जाईल अशा प्रकारचे वर्तन मी केले नाही. पक्षाकडून मिळालेल्या सर्व जबाबदाऱ्या मी ताकतीने पूर्ण केल्या. मिळालेल्या संधीचा वापर सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी केला. सर्वसामान्यांचे काम करताना एक रुपये घेतला नाही. जिल्हा बँकेमध्ये काम करताना सहा वर्षात बँकेचे उत्पन्न दुप्पट केले.

Sunil Mane
चिठ्ठीने केला राष्ट्रवादीचा घात; शिवाजीराव महाडिक बँकेवर जाता-जाता राहिले

तीन पक्षाचे सरकार असताना एका मताने काम करणे गरजेचे आहे. माझ्यावर राजकारण करून जरी कोणी मला दाबण्याचा प्रयत्न करत असेल, तर मी त्यांना सांगू इच्छितो कार्यकर्त्याच्या ताकतीवर मी जिल्हा बँकेवर पुन्हा येणार. पण, स्वाभिमानाने येणार असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर रहिमतपूर पालिका निवडणूक १९/० व सोसायटीमध्ये १३/० करण्याचे ध्येय त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना समोर ठेवले. सुनील माने यांच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या बॅनरवरून राष्ट्रवादीचे सर्वच नेते गायब झाल्याने परिसरामध्ये वेगळीच चर्चा होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com