सातारा बॅकेच्या अध्यक्षपदी शिवेंद्रराजे की नितीन पाटील ; तर्कविर्तकांना उधाण

शिवेंद्रराजे भोसले (shivendraraje bhosale) यांना पुन्हा अध्यक्ष करा, असा मानणारा एक गट आहे, तर गेल्यावर्षी संधी न मिळालेले नितीन पाटील (nitin patil) यांना अध्यक्ष करा, असी मागणी राष्ट्रवादीतून करण्यात येत आहे.
सातारा बॅकेच्या अध्यक्षपदी शिवेंद्रराजे की नितीन पाटील ; तर्कविर्तकांना उधाण
nitin patil,shivendraraje bhosalesarkarnama

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार शशिकांत शिंदे या दोन दिगग्ज नेत्यांचा पराभव झाला आहे. बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत सध्या चर्चा रंगल्या आहेत.

शिवेंद्रराजे भोसले (shivendraraje bhosale) यांना पुन्हा अध्यक्ष करा, असा मानणारा एक गट संचालक मंडळात आहे, तर गेल्यावर्षी संधी न मिळालेले (कै.) लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव नितीन पाटील (nitin patil) यांना अध्यक्ष करा, अशी मागणी राष्ट्रवादीतून करण्यात येत आहे. या दोन नावात कोण बाजी मारणार याबाबत तर्कविर्तकांना उधाण आलं आहे.

''शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje) यांच्यामुळे माझा पराभव झाला,'' असा आरोप आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी केला. 'हे त्यांचेच षडयंत्र आहे,' असे त्यांनी स्पष्ट केले.

nitin patil,shivendraraje bhosale
मृतदेह घेऊन जाणाऱ्या गाडीचा अपघात ; स्मशानभूमीजवळच १८ जणांचा मृत्यू

''शिवेंद्रसिंहराजे विषयी पक्षाने भूमिका जाहीर करावी, मी सरळपणाने निवडणूक लढवली, कोणतीही दादागिरी केली नाही. सातारा विधानसभा लढविणार का, या प्रश्नावर मी सध्या विधान परिषदेवर आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादीचे 9 आमदार कसे होतील यासाठी प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकीत पक्षाचा बालेकिल्ला अभेद्य राहावा यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निर्णय घ्यावा,'' असे शिंदे यांनी म्हटलं आहे.

बँकेचे नवीन संचालक मंडळाकडे पाहिले असता शिवेंद्रराजेंचे पारड जड असल्याचे दिसते. शशिकांत शिंदेंचा पराभव करणारे ज्ञानदेव रांजणे हे शिवेंद्रराजेंचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. तसेच राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते रामराजे नाईक निंबाळकर यांची आणि शिवेंद्रराजेंची मैत्री सगळ्यांना परिचित आहे. त्यामुळे शिवेंद्रराजेंचे नाव सध्यातरी आघाडीवर आहे. तर दुसरीकडे नितीन पाटील हे अध्यक्ष व्हावेत ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची जरी इच्छा असली तरी पुरेसे संख्याबळ आणि जिल्ह्यातील इतर ज्येष्ठ नेत्यांचा निर्णय यावर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत.

राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अंतिम निर्णय घेणार असल्याने त्यांच्या निर्णयाकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे अध्यक्षपदी शिवेंद्रराजे की नितीन पाटील विराजमान होणार हे लवकरच समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in