सदावर्तेंना सातारा न्यायालयाकडून जामीन मंजूर

छत्रपतींच्या वंशजांविरोधात Descendants of Chhatrapati आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात Satara city Police Station गुणरत्न सदावर्ते Gunratna Sadavarte यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
Gunratna Sadavarte
Gunratna Sadavartesarkarnama

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी दिली होती. आज न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.

छत्रपतींच्या वंशजांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तब्बल दोन वर्षानंतर सदावर्ते यांना या गुन्ह्याच्या चौकशीसाठी मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले होते. त्यांना अटक करून सातारा न्यायालयात दाखल केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती.

Gunratna Sadavarte
गुणरत्न सदावर्ते अंदर तर लालपरी निघाली डेपोतून बाहेर!

सोमवारी (ता. ११) त्यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तसेच त्यांच्या वकिलांकडून जामीनासाठी अर्जही दाखल करण्यात आला होता. दरम्यान, सातारा पोलिसांनी सदावर्ते यांना मुंबईतील आर्थर रोड कारागृहाच्या ताब्यात पुन्हा सुपूर्द केले. त्यानंतर आज सातारा न्यायालयाने सदावर्ते यांना १५ हजार रूपयांचा जामीन मंजूर केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com