शेळ्या चारायला गेलेल्या सरपंच भाभी बेपत्ता : पाच दिवसांनंतरही शोध लागेना

विहिरीत पडल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्या विहिरीतील सगळे पाणी उपसले. पण, काहीच हाती लागले नाही.
Zaitunbi Shaikh
Zaitunbi ShaikhSarkarnama

सोलापूर : शेळ्या चारायला गेलेल्या कवठे (ता. उत्तर सोलापूर Solapur) गावच्या महिला सरपंच (sarpanch) जैतुनबी शेख (वय ६०) या बुधवारपासून (ता. ७ सप्टेंबर) बेपत्ता झाल्या आहेत. सलगर वस्ती पोलिस (Police) त्यांचा शोध घेत आहेत. पण, अद्याप त्यांचा तपास लागलेला नाही. सरपंच भाभींना शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. (Sarpanch Bhabhi who went to graze goats missing : No trace even after five days)

Zaitunbi Shaikh
‘भूमरेसाहेब लयं मोठं मंत्री बनले आहेत; तीनशे रुपये तरी द्यायला लावा’ : ऑडिओ क्लिपने खळबळ

गावच्या सरंपचपदाची जबाबदारी पावणे पाच वर्षांपूर्वी जैतुनबी शेख यांच्या खांद्यावर आली. त्या शेळ्या बुधवारी (ता. ७ सप्टेंबर) सकाळी चारायला घेऊन गेल्या होत्या. दुपारी बाराच्या सुमारास त्या बेपत्ता झाल्या. त्यांच्या पतीसह दोन मुलांनी त्यांचा शोध घेतला. नातेवाइकांकडे चौकशी केली. पण, त्या सापडल्या नसल्याचे नातलगांनी त्यांना सांगितले.

Zaitunbi Shaikh
अतुल सावेंना सहकारातील कितपत माहिती? : राजू शेट्टींचे नव्या सहकार मंत्र्यांबाबत विधान

विहिरीत पडल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्या विहिरीतील सगळे पाणी उपसले. पण, काहीच हाती लागले नाही. पती, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. मुलांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे फौजदार सचिन मंद्रूपकर यांनी जैतुनबी यांचा शोध सुरू केला. कुटुंबातील सदस्यांचे जबाब घेतले. आठवडा, महिन्यापूर्वी कौटुंबीक कारणातून काही वादविवाद झाले होते का? गावातील कोणाशी भांडण झाले होते का? याचीही माहिती पोलिसांनी घेतली. पण, पोलिसांना ठोस काहीच मिळाले नाही. बेपत्ता महिला सरपंच मोबाईल वापरत नव्हत्या, त्यामुळे तपासात पोलिसांच्या हाती आजपर्यंत तरी ठोस काही लागलेले नाही. पोलिस वेगवेगळ्या बाजूंनी तपास करीत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांनीही त्यात लक्ष घातले आहे.

Zaitunbi Shaikh
नांगरे-पाटील, गुप्ता, आरती सिंह यांच्यासह २३ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या सप्टेंबरअखेर बदल्या?

‘डॉग स्कॉड’लाही माग निघेना

चार दिवसांपासून बेपत्ता झालेल्या महिला सरपंच जैतुनबी यांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिसांना त्या शेळ्या चारत असलेल्या ठिकाणी रविवारी (ता. ११ सप्टेंबर) त्यांची चप्पल आढळली. त्यांच्या मुलांनी आईचीच चप्पल असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर फौजदार मंद्रूपकर यांनी डॉग स्कॉडला पाचारण केले. पण, काही अंतरावर जाऊन श्वान घुटमळले, त्यामुळे पोलिसांना पुन्हा माघारी परतावे लागले. आता पोलिसांनी गावातील लोकांकडे नेमक्या कारणांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com