Sanyukta Maharashtra : शिंदे सरकार सीमाप्रश्नी गंभीर नाही : महाराष्ट्र एकीकरण समिती उचलणार मोठे पाऊल

महाराष्ट्र सरकार सीमा प्रश्नाकडे अजूनही गांभीर्याने पाहत नसल्याची सीमा बांधवांची तक्रार आहे.
Maharashtra Ekikaran Samiti
Maharashtra Ekikaran Samiti

Sanyukta Maharashtra News : महाराष्ट्र एकीकरण समितीने आता 'चलो मुंबई'चा नारा दिला आहे. पुढील महिन्यात 27 फेब्रुवारीपासून महाराष्ट्र एकीकरण समितीने मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलनाची घोषणा केली आहे.

महाराष्ट्र सरकार सीमा प्रश्नाकडे अजूनही गांभीर्याने पाहत नसल्याची सीमा बांधवांची तक्रार आहे. त्यामुळे राज्य सरकारला जाग आणण्यासाठी पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सीमा प्रश्नाकडे वेधण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहे.

Maharashtra Ekikaran Samiti
Koyta Gang News : पुण्याच्या पोलिस आयुक्तांचा कित्ता पिंपरीचे नवे आयुक्त गिरवतील का ?

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्राने जे शक्य आहे ते करावे, सीमा भागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय-अत्याचार दूर करण्यासाठी केंद्राच्या मदतीने कर्नाटक सरकारवर दबाव आणावा, यासाठी महाराष्ट्र एकीककरण समिती येत्या 27 फेब्रुवारी रोजी ‘चलो मुंबई’ आंदोलन छेडण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिली.

Maharashtra Ekikaran Samiti
Koyta Gang News : पुण्याच्या पोलिस आयुक्तांचा कित्ता पिंपरीचे नवे आयुक्त गिरवतील का ?

''महाराष्ट्रातील सर्व पक्षांना सीमापभागातील प्रश्नांबाबत जागे करण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्नाच्या दाव्यांबद्दल त्यंनी जास्त सतर्क राहाण्यासाठी पुढच्या महिन्यात 27 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ‘चलो मुंबई’ आंदोलन छेडून आम्ही धडक मोर्चा काढून मुंबई गाठणार असल्याचं किणेकर यांनी सांगितलं. तसेच‘चलो कोल्हापूर’ आंदोलनावेळी महाराष्ट्र बंदबाबतही विनंती केली होती. पण त्याबद्दल कोणतीही हालचाल झाली नसल्याबद्दल हा निर्णय घेतल्याचेही किणेकर म्हणाले.

मुंबईतील आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन केले जाईल. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्राने जे शक्य आहे ते करावे अशी विनंती या आंदोलनातून केली जाणार आहे. तसेच बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडूनस सुरु असलेला अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी केंद्राच्या मदतीने कर्नाटकात दबाव टाकला जावा, अशी मागणी आम्ही या आंदोलनातून केली जाणार असल्याचे किणेकर यांनी दिली.

याशिवाय दरवर्षी प्रमाणे यावर्षीही 17 जानेवारीला सकाळी सकाळी 9:30 वाजता हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम होणार आहे. घटक समित्या ज्याप्रमाणे आपापल्या भागात हा हुतात्मा दिनाचा कार्यक्रम करावा, अशी सूचना त्यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com