
Sanjaykaka Patil : सांगलीतील जत तालुक्यात खासदार संजयकाका पाटील हे भारतीय जनता पक्षाचेच पाळेमुळे रोखत आहेत. संजयकाका हे नेमके भाजपचे आमदार आहेतआहेत की, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे, असा रोख सवाल भाजप जत तालुक्याचे अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी विचारला आहे. पत्रकाद्वारे त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. यामुळे मागील दोन दिवसांपासून जत तालुक्यात भाजपच्याच अंतर्गत राजकारण पेटलेले दिसून येत आहे.
प्रसिद्ध केलेल्या पत्रकात प्रमोद सावंत यांनी म्हंटले की, मागील विधानसभा निवडणुकीत खासदारांनी भाजपचे उमेदवार जगताप यांना पराभव घडवण्यात भूमिका बजावण्याचे पाप केले. आजही, त्यांचे अशाच प्रकारचे काम सुरूच आहे. मात्र हे असले प्रकार आता यापुढे भाजप कार्यकर्ते खपवून घेणार नाहीत. नुकतेच २० डिसेंबर रोजी संजयकाका यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्धाटन झाले. यावेळी सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित राहिले होते.
२०१९ विधानसभेला भाजपासोभत गद्दारी केलेल्या सर्व बीट हवालदार यांची फौज घेऊनच संजयकाका फिरतात. आमचे नेते विलासराव जगताप हे लोकसभेला आणि विधानसभेला दोन्ही निवडणुकांत तिकिट मिळवण्यापासून त्यांच्या प्रचार केला. निष्ठा नावाचा प्रकारच नसलेल्या सत्तापिपासू खासदार आहेत. भाजपची पाळेमुळे रोखत त्यांनी भाजप विरोधात काम केले.
वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार :
खासदार संजयकाकाका पाटील यांनी भाजप विरोधातल्या सगळ्या गोष्टी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करणार आहे, असे प्रमोद सावंत यांनी पत्रकात म्हटले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.