Satara News: संजय राऊतांची तोफ साताऱ्यात धडाडणार; शुक्रवारी शिवगर्जना मेळावा

Sanjay Raut News: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून शिवगर्जना अभियानाला सुरवात केली आहे. येत्या शुक्रवारी (ता. ३ मार्च) शिवनिर्धार मेळावा साताऱ्यात होत आहे.
MP Sanjay Raut
MP Sanjay Raut sarkarnama

Satara News : उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) शिवसेना पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची तोफ शुक्रवारी साताऱ्यात धडाडणार आहे. शिवसेनेच्या शिवगर्जना अभियानातंर्गत (Shivgarjana) त्यांच्या उपस्थितीत साताऱ्यातील शाहू कलामंदीरात शिवनिर्धार मेळावा होणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून शिवगर्जना अभियानाला सुरवात केली आहे. येत्या शुक्रवारी (ता. ३ मार्च) शिवनिर्धार मेळावा, साताऱ्यात होत आहे. साताऱ्यातील शाहू कला मंदीरात सायंकाळी पाच वाजता हा शिवनिर्धार मेळावा होत आहे. त्यामध्ये खासदार संजय राऊत मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी खासदार प्रियंका चतुर्वेदी, प्रवक्ते लक्ष्मण हाके, माजी आमदार बाबूराव माने, युवा सेनेचे विक्रांत जाधव हे उपस्थित राहणार आहेत. या शिवनिर्धार मेळाव्याची तयारी करण्यात जिल्ह्यातील ठाकरे सेनेचे पदाधिकारी व जिल्हा प्रमुख व्यस्त आहेत. खासदार राऊत या मेळाव्यात सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई व आमदार महेश शिंदे यांच्यावर कोणती तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MP Sanjay Raut
Satara : शाळा शिकू का शेत राखू... परळी खोऱ्यातील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा आक्रोश मोर्चा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com