संजय बनसोडे म्हणाले, प्राजक्त तनपुरे कॅबिनेट मंत्री होतील...

मंत्री संजय बनसोडे यांनी मंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांच्या बाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले.
Sanjay Bansode & Prajakt Tanpure
Sanjay Bansode & Prajakt TanpureSarkarnama

राहुरी ( जि. अहमदनगर ) - राहुरी येथे नगरपालिकेतर्फे बौद्ध विहार इमारतीचे लोकार्पण व विविध विकास कामांचा प्रारंभ पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे होते. या प्रसंगी बोलताना मंत्री संजय बनसोडे यांनी मंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळू शकते, असे सांगितले. ( Sanjay Bansode said, Prajakt Tanpure will be the cabinet minister ... )

संजय बनसोडे म्हणाले, "दहा राज्यमंत्र्यांमध्ये मंत्री तनपुरे सर्वात अभ्यासू, शांत, सुस्वभावी व टॉपर मंत्री आहेत. विधानसभा अधिवेशनात आमदारांच्या प्रश्नावर उत्तरे देण्यासाठी कॅबिनेट मंत्री त्यांना आग्रह करतात. त्यांच्या अभ्यासपूर्ण उत्तरांवर विरोधी आमदारांची बोलती बंद होते. लवकरच त्यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळू शकते."

Sanjay Bansode & Prajakt Tanpure
प्राजक्त तनपुरे म्हणाले, लवकरच भारनियमन कमी करणार

मंत्री बनसोडे पुढे म्हणाले, "मुंबई येथे इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्यदिव्य स्मारक 2024 मध्ये पूर्ण होईल. देशाचे नेते खासदार शरद पवार यांनी समतेचे विचार दिले. महिलांना आरक्षण दिले. महाविकास आघाडी सरकारने मागासर्वीय समाजाला ऊर्जा, शिक्षण, पाणीपुरवठा अशी तीन मंत्रीपदे दिली. अशा सर्वांना सामावून घेणाऱ्या महाआघाडी सरकारच्या पाठीशी उभे राहावे," असे मत त्यांनी व्यक्त केले.

मंत्री तनपुरे म्हणाले, "राहुरीच्या 100 कोटींच्या भूमिगत गटार योजनेच्या कामास येत्या दोन महिन्यात तांत्रिक मंजुरी मिळेल. प्रधानमंत्र्यांच्या नावाने राबविलेल्या घरकुल योजनेकडे केंद्र सरकारने दूर्लक्ष केले. 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याची घोषणा फसवी ठरली. भाजपा सरकारने वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी एक रुपया निधी दिला नाही. त्याचा बॅकलॉग भरुन काढत आहे. शहरातील वाड्या-वस्त्यांवरील रस्ते डांबरीकरण करणार आहे. जलतरण तलावासाठी साडेतीन कोटी रुपये दिले," असे त्यांनी सांगितले.

Sanjay Bansode & Prajakt Tanpure
प्राजक्त तनपुरे म्हणाले, वीजकंपन्यांचे खासगीकरण करणार नाही...

"देशाचे नेते खासदार शरद पवार यांच्या शिकवणीनुसार सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून काम करीत आहे." असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

या प्रसंगी जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक अरुण तनपुरे, शिर्डी संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे, अभिजित ससाणे, मुख्याधिकारी अजित निकत, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, बाबासाहेब भिटे, अमोल भनगडे, अनिल कासार, राधा संजय साळवे, नंदकुमार तनपुरे, शहाजी ठाकूर, बाळासाहेब उंडे, विलास तनपुरे, मच्छिंद्र गुलदगड, बबन साळवे, सचीन साळवे, दीपक साळवे उपस्थित होते. माजी उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in