संग्रामसिंह कुपेकरांचे अपिल फेटाळले अन्‌ आमदार राजेश पाटील नॉट आऊट राहिले!

चंदगड अर्बन चषक क्रिकेट स्पर्धेत नेतेमंडळींनी घेतला खेळाचा आनंद
Sangram Singh Kupekar-MLA Rajesh patil
Sangram Singh Kupekar-MLA Rajesh patil Sarkarnama

चंदगड : राजकारणाच्या मैदानात एकमेकांना गुगली टाकणाऱ्या नेत्यांची चंदगड येथे क्रिकेटच्या मैदानावरही चांगलीच झटापट पहायला मिळाली. एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्‌घाटनावेळी यष्टीरक्षण करणाऱ्या संग्रामसिंह कुपेकर यांनी फलंदाज आमदार राजेश पाटील यांना स्टंपिंग करत आउट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमदारांनी क्रीझ सोडले नसल्यामळे पंचांनी कुपेकरांचे आउटचे अपिल फेटाळले आणि आमदार पाटील नॉट आऊट राहिले. (Sangram Singh Kupekar's appeal rejected and MLA Rajesh Patil remained not out!)

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे चंदगड अर्बन बँकेच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेच्या उद्‍घाटन समारंभासाठी आमदार राजेश पाटील, माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, गोपाळराव पाटील, संग्रामसिंह कुपेकर आदी उपस्थित होते. या चषकाचे उद्‍घाटन झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून नेतेमंडळींना क्रिकेट खेळण्याचा आग्रह करण्यात आला. आमदार राजेश पाटील यांच्यासह सर्वांनीच कार्यकर्त्यांचा क्रिकेट खेळण्याचा आग्रह मान्य केला.

Sangram Singh Kupekar-MLA Rajesh patil
‘पीएमआरडीए’च्या निवडणुकीत मताला दहा हजारांचा भाव फुटल्याची चर्चा...

सुरुवातीलाच तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार राजेश पाटील यांनी हाती बॅट घेत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आमदार पाटील हे बॅटींगला उतरल्यानंतर संग्रामसिंह कुपेकर यांनी हाती ग्लोव्हज चढवत यष्टिरक्षण केले. आमदार महोदयांना बँकेचे अध्यक्ष दयानंद काणेकर यांनी बॉलिंग करणे पसंत केले. काणेकर यांनी टाकलेला एक बॉल आमदारांकडून सुटला आणि कुपेकर यांच्या हाती गेला. त्याचवेळी सावध असलेल्या संग्रामसिंहांनी आमदार पाटील यांना स्टंपिंगच्या माध्यमातून आऊट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजकारणाप्रमाणचे क्रीझमध्ये राहूनच बॅटींग करण्याची सवय आमदार पाटील यांच्या क्रिकेटच्या मैदानातही कामी आली आणि कुपेकरांनी केलेले अपिल पंचांनी फेटाळून लावल्याने आमदार नॉट आउट राहिले.

Sangram Singh Kupekar-MLA Rajesh patil
खासदार होताच अवघ्या अडीच वर्षांतच अमोल कोल्हेंवर एकांतवासाची वेळ का आली?

थोडा वेळ बॅटिंग केल्यानंतर आमदार राजेश पाटील यांनी बॉलिंग केली, तर संग्रामसिंह कुपेकर यांनी जोरदार फटकेबाजी करत आपल्या क्रिकेट खेळाचे कौशल्य सादर केले. माजी मंत्री भरमूअण्णा पाटील व गोपाळराव पाटील यांनी मात्र शेजारी उभे राहून खेळाचा आनंद लुटण्यास पसंती दिली. नेतेमंडळींची क्रिकेटच्या मैदानावरील ही खेळीही चंदगडमध्ये चर्चेचा विषय ठरली होती. त्याची राजकीय अनुषंगाने चर्चा रंगली होती. राजकीय मैदानावर एकमेकांच्या विरोधात डावपेच आखणाऱ्या नेतेमंडळींनी खेळाच्या मैदानावर जसी एकजूट दाखवली, तशीच विकासकामांसुद्धा एकत्र राहून चौकार, षटकार ठोकावेत, अशी अपेक्षाही जनतेमधून व्यक्त केली जात आहे.

Sangram Singh Kupekar-MLA Rajesh patil
विधान परिषदेच्या जागांसाठी तीन पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच !

क्रिकेट स्पर्धेच्या उद्‍घाटनाच्या कार्यक्रमाला आमदार राजेश पाटील हे टी-शर्ट, ट्रॅक सूट व स्पोर्ट शूज घालून आले होते. प्रसंग पडला तर खेळावे लागणार, याची तयारी करूनच ते मैदानावर उतरले होते. तत्पूर्वी पाटणे फाटा येथे मॅरेथॉन स्पर्धेत ते धावून आले होते. त्यांच्या या तयारीचीसुद्धा चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com