आमदार पाटलांचा गौप्यस्फोट : मतदारांना ५७ लाख वाटले; मटणपार्ट्यांसह पत्त्यांसाठी रोकडही दिली

सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या दुरवस्थेला मी स्वतः काही प्रमाणात जबाबदार असल्याची जाहीर कबुलीही शहाजीबापू पाटील यांनी या वेळी दिली
Sahajibapu Patil
Sahajibapu PatilSarkarnama

पंढरपूर : सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मतदारांना तीन-तीन हजार रुपये रोख वाटले, शिवाय त्यांना मटन आणि माशांची पार्टीही दिली. त्या काळात 57 लाख रुपये वाटून कारखान्याची निवडणूक लढवली, असा मोठा गौप्यस्फोट सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी आज सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात केला. (Sangola Sugar Factory election contested by distributing money to voters: MLA Shahaji Patil)

आमदार पाटील यांच्या गौप्यस्फोटानंतर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत होणाऱ्या गैरप्रकाराचे जळजळीत सत्य आणि वास्तव समोर आले आहे. सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या दुरवस्थेला मी स्वतः काही प्रमाणात जबाबदार असल्याची जाहीर कबुली देत याच कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांची माफीदेखील मागितली.

वाकी शिवणे (ता. सांगोला) येथील सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना अलीकडेच राज्य सहकारी बॅंकेने पंढरपूर येथील उद्योजक अभिजित पाटील यांच्या धाराशिव साखर कारखान्याला 25 वर्षांच्या भाडेपट्टा कराराने चालवण्यास दिला आहे. अभिजित पाटील यांनी अवघ्या दीड महिन्यात कारखाना सुरु केला. कारखान्याचा प्रथम गळित हंगामाचा शुभारंभ आज सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून झाला.

Sahajibapu Patil
मी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक नाही

याच कार्यक्रमात या कारखान्याचे माजी अध्यक्ष आमदार शहाजी पाटील यांनी कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांना पैसे वाटून आणि त्यांना मटन खायला घालून कारखान्याच्या निवडणुकीत गणपतराव देशमुख गटाला कसा हिसका दाखवला हे सांगताना त्यांनी कारखान्याच्या निवडणुकीत आपण कसा प्रताप केला, हेदेखील सांगून टाकले. कारखान्याच्या दुरवस्थेला माझ्यासह सर्वच नेते जबाबदार आहेत. मी देखील तितकाच पापी असल्याची कबुली देत त्यांनी याच जाहीर कार्यक्रमात शेतकऱ्यांची माफीदेखील मागितली. आमदार पाटील यांच्या या गौप्यस्फोटामुळे कारखाना का बंद पडला, याचे उत्तरही उपस्थितांसह तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाले.

Sahajibapu Patil
'भारतीय जनता पक्षाला डिसेंबरमध्ये मोठे खिंडार'!

सांगोला साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी; म्हणून माजी आमदार (कै.) गणपतराव देशमुख यांच्याकडे माझे काही संचालक घ्या, असा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी गणपतराव देशमुख यांनी वेळ निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर दिल्ली, हरियाणा, लुधियाना येथून विमानाने सभासदांना आणले. एवढेच नाही तर सभासदांना तीन तीन हजार रुपये वाटप केले. निवडणुकीदरम्यान 1700 सभासदांना कोल्हापुरात ठेवले. त्या ठिकाणी त्यांच्या खाण्यापिण्याची व पत्ते खेळण्यासाठी लागणारे पैसेही दिले, अशी कबुली आमदार पाटील यांनी या वेळी दिली.

आमदार पाटील यांनी कारखाना उभारणीमध्ये कोणी कोणी कसा गैरकारभार केला याची उदाहणे देत, कारखान्याच्या दुरवस्थेला आम्ही जबाबदार असल्याचेही मान्य केले. आमदार पाटील यांच्या गौप्यस्फोटानंतर राज्यातील काही सहकारी साखर कारखान्यांत चालणाऱ्या गैरकारभाराचे सत्य समोर आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com