गणपतराव देशमुखांच्या नातवांनी बिनविरोधची परंपरा जपली; सांगोला सूतगिरणीसाठी आजी-माजी आमदारांचीही साथ

माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर प्रथमच होऊ घातलेल्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
Sangola Spinning Mill
Sangola Spinning Mill Sarkarnama

सांगोला (जि. सोलापूर) : सांगोला (sangola) शेतकरी  सहकारी सूतगिरणीच्या निवडणूकीत १७ जागांसाठी १७ जणांचे उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणूक (Election) बिनविरोध (Unopposed) पार पडली. माजी आमदार भाई गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांच्या निधनानंतर प्रथमच होऊ घातलेल्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, गणपत आबांच्या नातवांनी बिनविरोधची परपंरा जपत ही सूतगिरणी बिनविरोध करून दाखवली आहे. अर्थात, त्यासाठी सांगोल्याच्या आजी-माजी आमदारांनी देशमुख यांना साथ दिली आहे.  स्थापनेपासूनच  शेतकरी सहकारी सूत गिरणीची निवडणूक बिनविरोध होत आहे. (Sangola Cooperative Spinning Mill Election Unopposed)

सांगोला सूतगिरणीच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी १७ जागांसाठी ७३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्जाची ता. १२ ऑक्टोबर रोजी छाननी करण्यात आली, त्यात १७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते. उर्वरीत ५६ उमेदवारांची अर्ज वैध झाले होते. शेतकरी सहकारी सूत गिरणीच्या सूतगिरणीच्या ११ हजार ५६० सभासदांपैकी कापूस उत्पादक शेतकरी ७ हजार ९३, तर बिगर कापूस उत्पादक शेतकरी ४ हजार ४६७ असे एकूण ११ हजार ५६० सभासद (मतदार) आहेत. तर संस्था प्रतिनिधी मतदार संख्या ८१ आहेत. 

Sangola Spinning Mill
‘राष्ट्रवादी पुन्हा...’ हे गाणे वाजवून केले चंद्रकांत पाटील यांचे स्वागत!

दरम्यान, राज्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने  सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाने ३० सप्टेंबरपर्यंत स्थगित केल्या होत्या. त्यानंतर सहकार विभागाने १२ ऑक्टोबरपासून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सतरा जागांसाठी फक्त १७ उमेदवार शिल्लक राहिल्याने ही लक्षवेधी निवडणूक बिनविरोध झाली आहे. बिनविरोध निवडणुकीसाठी गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ बाबासाहेब देशमुख आणि डॉ अनिकेत देशमुख यांना सांगोल्याचे विद्यमान आमदार शहाजी पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे यांनी मोलाचे सहकार्य केले. याशिवाय शेतकरी कामगार पक्षासह बाळासाहेबांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व इतर सर्वच पक्षांनी मदत केली.

Sangola Spinning Mill
अंधेरी पोटनिवडणुकीत ट्विस्ट : अर्ज माघारीसाठी दबाव टाकला; अपक्ष उमेदवाराच्या तक्रारीची आयोगाकडून दखल

सांगोला सूतगिरणीचे नूतन संचालक मंडळ पुढीलप्रमाणे (कापूस उत्पादक शेतकरी मतदारसंघ) : चंद्रकांत गणपतराव देशमुख (सांगोला), अण्णासाहेब गणपतराव देशमुख  (सांगोला), संतोष शांताराम पाटील (महूद), नितीन कृष्णा गव्हाणे  (कडलास), भारत हणमंत बंडगर  (अनकढाळ), बाबासाहेब रामचंद्र करांडे (लोटेवाडी), विश्वंभर नारायण काशीद  (पंढरपूर). बिगर कापूस उत्पादक शेतकरी मतदार संघ : मधुकर विठ्ठल कांबळे  (सांगोला), अंकुश लक्ष्मण बागल (खिलारवाडी), विक्रांत महादेव गायकवाड (कडलास), दिलीप शिवाजी देशमुख (कोळे).

Sangola Spinning Mill
'राज्याला अजित पवार यांचासारखा मुख्यमंत्री हवा'

संस्था प्रतिनिधी मतदार संघ :  सागर भगवान लवटे (लोटेवाडी). अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ : बाळासाहेब संदिपान बनसोडे (सांगोला). महिला राखीव मतदार संघ : ताई शिवाजी मिसाळ (पाचेगाव), सीतादेवी सुनील चौगुले (गुंजेगाव, ता. मंगळवेढा). इतर मागासवर्गीय मतदार संघ- प्रभाकर एकनाथ माळी (सांगोला). वि.जा/ भ.ज./वि.मा.प्र.मतदार संघ : कुंडलिक पंढरी आलदर (कोळे).

शेकापसह आजी-माजी आमदारांची मदत : बाबासाहेब देशमुख

सांगोला सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शेकापच्या सर्वच सहकाऱ्यांची साथ लाभली. तसेच, आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांनीही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोलाची साथ दिली आहे, असे गणपतराव देशमुख यांचे नातू आणि पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in