भाजपच्या नाराज गटाला काँग्रेस-राष्ट्रवादीचा शब्द; तर फडणवीसांचा अध्यक्ष बदलाचा निरोप

जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी एकविचाराने आणि सावधपणे ही प्रक्रिया पार पाडा, असा आदेश विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला
Chandrakant Patil-Devendra Fadnavis
Chandrakant Patil-Devendra FadnavisSarkarnama

सांगली : सांगली जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि सभापती बदल करा. जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी एकविचाराने आणि सावधपणे ही प्रक्रिया पार पाडा, असा आदेश विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. त्या अनुषंगाने आता मंगळवारी (ता. १२ आक्टोबर) भाजपची जिल्हा कोअर समितीची बैठक होणार आहे. प्रदेश पातळीवर एका पदाधिकाऱ्याकडे याबाबतचा निरोप आला असून त्यांनी याला दुजोरा दिला आहे. (Sangli Zilla Parishad will have a change of president and Sabhapati)

सांगली जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदलाचा विषय गेल्या सहा महिन्यांपासून गाजत आहे. बदल होत नसल्याने भाजपला गळती लागण्याची चिन्हे दिसू लागली आहे. दोन सदस्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. अंकलखोपचे नितीन नवले राष्ट्रवादीत, तर जतचे सरदार पाटील काँग्रेसमध्ये गेले आहेत. भाजपच्या सदस्यांनीच पाटील यांचा सत्कार करत नाराजी व्यक्त केली. दहा सदस्यांनी शुक्रवारी सायंकाळी पालकमंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. सोबतच, राजकीय भवितव्याबाबत चर्चा करण्यासाठी सविस्तर भेटीसाठी वेळही मागितली आहे.

Chandrakant Patil-Devendra Fadnavis
विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेसमध्ये वाद पेटला : पर्याय खुला असल्याचा इशारा

अध्यक्ष व सभापती बदलाबाबत भाजपचा एक गट आग्रही आहे. खासदार संजय पाटील त्याचे नेतृत्व करत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पंढरपूर आणि मुंबई येथे दोन बैठका झाल्या. त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे निरोप पाठवतो, असे सांगितले. अखेर तो निरोप आज आला. बदलाबाबत चर्चेसाठी मंगळवारी बैठक बोलावली आहे. नवीन इच्छुकांची नावे चर्चेत येतीलच, शिवाय या प्रक्रियेत शिवसेना, अजितराव घोरपडे समर्थक, रयत आघाडी आदी सहकाऱ्यांना सोबत घेण्याबाबत चर्चा होईल. महापालिकेत महापौर निवडीवेळी झटका बसला, आता जिल्हा परिषदेत गडबड होऊ नये, यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीशी समझोत्याचा विषय पुढे येईल. ती जबाबदारी खासदार पाटील यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे.

Chandrakant Patil-Devendra Fadnavis
तौफिक शेख यांचा व्हिडिओ खासदार ओवेसींकडे

आज कोअर कमिटीची एक बैठक झाली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीविषयी चर्चा झाली. त्यात गटनिहाय आढावा घेण्यात आला. कुठल्या ठिकाणी किती ठराव आहेत, याचा प्राथमिक अंदाज घेतला गेला. खासदार पाटील, आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक, प्रदेशचे पदाधिकारी पृथ्वीराज पवार, शेखर इनामदार, नीता केळकर उपस्थित होते.

गणिताची भीती नको!

खासदार संजय पाटील यांनी जिल्हा परिषदेत अध्यक्ष बदल करताना आकड्यांची चिंता करू नका, असा विश्‍वास फडणवीस यांना दिला आहे. पुढील निवडणूक चार महिन्यांवर असताना पदाधिकारी बदलात ढवळाढवळ करणार नाही, असा शब्द काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी भाजपच्या नाराज गटाला एका खासगी बैठकीत दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे बदल झाल्यास तो बिनविरोधच होईल, याबाबत खबरदारी घेतली जाणार आहे.

आजच्या बैठकीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत चर्चा केली. मतदार याद्या, सोसायट्यांचे ठराव याचा प्राथमिक आढावा घेतला. दोन दिवसांत जिल्हा परिषदेतील परिस्थितीवर चर्चा होईल. पदाधिकारी बदलास कुणाचाच विरोध नाही, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com