झेडपीतील कारभारी बदलास पुन्हा ब्रेक; संजयकाकांसह इच्छुकांच्या भूमिकेकडे लक्ष!

भाजप नेते आणि इच्छुकांनाही या बदल प्रक्रियेत फार रस राहिलेला नाही.
bjp
bjp sarkarnama

सांगली : सांगली जिल्हा परिषदेत (Sangli Zilla Parishad) अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती बदलाच्या तलवारी जवळपास म्यान झाल्या आहेत. आता आचारसंहिता लागू होण्यासाठी अवघे ५०-६० दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे भाजप नेते (BJP Leader) आणि इच्छुकांनाही या बदल प्रक्रियेत फार रस राहिलेला नाही. त्यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाची लहर आहे. (Sangli Zilla Parishad office bearers change break due to election)

जिल्हा परिषदेत सहा महिन्यांपूर्वीच पदाधिकारी बदलाचे नियोजन करण्यात आले होते. महापालिकेत महापौर निवडीच्या प्रक्रियेत भाजपला मोठा फटका बसला होता. भाजपची स्पष्ट सत्ता असताना, बहुमत असताना राष्ट्रवादीचा महापौर झाला होता, त्यामुळे जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदल टाळण्यात आला होता. पण, बदलासाठी आग्रही असलेला गट नाराज झाला होता, त्यातून दोन सदस्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

bjp
जयंतराव, विश्वजित कदमांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सांगली बँकेसाठी 85 टक्के मतदान

आता तीन महिने बाकी असताना नाराज गटाने उचल खाल्ली. खासदार संजय पाटील यांनी आग्रही भूमिका घेतली होती आणि वातावरण बदलासाठी तयार केले गेले. या घडामोडींमध्ये जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार विलासराव जगताप, शिवसेना नेते अजितराव घोरपडे, सम्राट महाडिक आदींनी नकारात्मक सूर लावला होता. तरीही, खासदार गटाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून ‘बदल करा’, असा संदेश मिळवला. त्यानंतर राजीनामा नाट्य रंगले. अध्यक्ष, सभापतींनी राजीनामा दिला आहे, असे जाहीर करण्यात आले. तोवर जिल्हा बँकेची निवडणूक लागली आणि हा विषय मागे पडत गेला.

bjp
शिवसेनेला नकोय एकहाती सत्तेत काँग्रेस-राष्ट्रवादीचा वाटा!

आता जिल्हा परिषदेच्या गट निश्‍चितीचे आदेश निघाले आहेत. हा निवडणुकीचा पहिला बिगूलच आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर व्हायला उणेपुरे पन्नास-साठ दिवस बाकी राहिलेले आहेत. या काळात राजीनामा घेणे, नवीन निवडी हे नाट्य घडवून आणणे यासाठी खूप वेळ लागू शकतो. त्यामुळे ही प्रक्रिया आता गरजेची आहे का? हा मुद्दा समोर येणार आहे. सहाजिकच, नव्या निवडीच्या नाट्यावर आता पडदा पडल्यात जमा आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांना पन्नास-साठ दिवस मिळणार असून या काळात विकासाला गती देण्याचा त्यांचा मानस आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com