Anil Babar News : बारामतीत काय ठरलं होतं ? ; पडळकर-बाबर यांच्यात कलगीतुरा सुरु

Anil Babar News : आमदारकी बाबत विधान करुन वात पेटवून दिली होती. त्याला अनिल बाबर यांनी आता सडेतोड उत्तर दिले आहे.
Anil Babar, Gopichand padalkar
Anil Babar, Gopichand padalkarsarkarnama

Gopichand Padalkar News : भाजपचे नेते, आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांनी काही दिवसापूर्वी खानापूर मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर (mla anil babar) यांच्या आमदारकी बाबत विधान करुन वात पेटवून दिली होती. त्याला अनिल बाबर यांनी आता सडेतोड उत्तर दिले आहे.

'२०२४ ची विधानसभा निवडणूक अनिल बाबर लढविणार नाहीत, तसे आमचे बारामतीमध्ये गेल्या निवडणुकीत ठरले होते. त्यामुळे खानापुरचा पुढील आमदार हा भाजपचाच होईल," असे पडळकर खानापूर तालुक्यातील मोही येथील एका कार्यक्रमात म्हणाले होते.

पडळकरांच्या या विधानाला बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार अनिल बाबर यांनी सुलतानगदे येथील कार्यक्रमात पडळकर यांना चांगलेच सुनावलं आहे. त्यामुळे आता पडळकर-बाबर असा वाद रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Anil Babar, Gopichand padalkar
Bhagavad Gita News : धर्मांतर अन् लव्हजिहादच्या चर्चेत मुस्लीम शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय

सत्ता आली की काही जणांचे डोळे फिरतात

"मी आजारी असताना पोटनिवडणूक लागणार, असा प्रचार काही जणांनी केला होता. एका सभेत काय सांगितले होते, हे सगळ्यांना माहित आहे. त्याला आता वर्ष झाले आहे. त्यावेळी त्यांनी मला बारामतीत काय ठरले आहे, सांगायला पाहिजे होते, पण सत्ता आली की काही जणांचे डोळे फिरतात," असा टोला अनिल बाबर यांनी पडळकरांना लगावला आहे.

Anil Babar, Gopichand padalkar
Pune News : महापालिकेच्या इतिहासात 'या' विभागाला मिळाले सर्वाधिक उत्पन्न

तो आमदार येथील जनताच ठरवेल

आगामी निवडणूक ही भाजप आणि शिंदे गट एकत्र लढणार असल्याची घोषणी दोन्ही पक्षानी केली आहे. या निर्णयानंतर अनिल बाबर-गोपीचंद पडळकर यांच्यात आता कलगीतुरा रंगला आहे. "खानापूर मतदार संघाचा आमदार पडळकर किंवा मी ठरविणार नाही, तो आमदार येथील जनताच ठरवेल,"अशा स्पष्ट शब्दात बाबर यांनी पडळकरांना फटकारलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com