Sangli News : आबा-काकांच्या पुढच्या पिढीमध्ये होणार तासगावचा राजकीय संघर्ष!

Sangli News : "ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी!"
Sangli News :
Sangli News :Sarkarnamam

Sangli News : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील आणि विद्यमान सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांच्यातला राजकीय संघर्ष अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रुत होते. हाच राजकीय संघर्ष आता आबा आणि काकांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये सुरू झाला आहे. तासगावचा राजकीय संघर्ष जिंकण्यासाठी आता रोहित पाटील आणि प्रभाकर पाटील यांच्यात हा सामना होणार आहे.

आबा काकांचा राजकीय संघर्ष त्यांच्या मुलांमध्येही रंगणार आहे. सांगली जिल्ह्यातला तासगाव तालुका आर आर पाटील आणि संजयकाका पाटील या दोन पाटलांमधला राजकीय संघर्षाचा आखाडा म्हणून राज्याला परिचित होते. आता तासगावच्या याच राजकीय आखाडा आबा आणि काका यांच्या मुलांचा राजकीय संघर्षाचा आखाडा बनला आहे.

आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून रोहित पाटील यांचं तिकीट जवळपास पक्कं मानण्यात येतो. राजकीय वर्तुळात, तसेच सांगलीमध्ये रोहित पाटील यांचा उल्लेख भावी आमदार असा केला जातो. तर दुसरीकडे रोहित पाटलांना टक्कर देण्यासाठी संजयकाका पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील मैदानात उतरले आहेत. समर्थकांकडूनही त्यांचा उल्लेखही भावी आमदार असाच करण्यात येतो. यावरूनच आता दोन्ही युवा नेत्यांमध्ये शाब्दिक वार प्रतिवार होत आहेत.

प्रभाकर पाटील एका सभेत बोलताना म्हणाले, 'मला विरोधकांना सांगायचंय संजय पाटील नावाच्या वाघाचा मी छावा आहे. एकदा मनावर आम्ही घेतलं तर गुंडगिरी करणारे घरातून बाहेर पडणार नाहीत, या ठिकाणी मी सांगून ठेवतो. या गावात गुंडगिरू करू नका. माझी विनंती आहे. आम्ही आमच्या मार्गावर आलो तर तुम्ही घरातूनही बाहेर पडणार नाही, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे रोहित पाटलांना इशारा दिला.

यावर प्रत्युत्तर देताना रोहित पाटील म्हणाले, "कुणीतरी मला घराच्या बाहेर पडू देणार नाही, असं म्हणतंय. मी त्यांना आज सांगतोय. ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाबळी असतात.आबांच्या कोणत्याही कार्यकर्त्याला हात लावला तर लक्षात ठेवा गाठ रोहित पाटलाशी आहे." या शाब्दिक वार - प्रतिवारामध्ये २०२४ ची निवडणुकीत तासगावमध्ये जोरदारल संघर्ष होणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत.

रोहित पाटील यांच्या मातोश्री विद्यमान तासगावच्या आमदार आहेत. यामुळे तासगावचा किल्ला अभेद्य ठेवण्यासाठी रोहित पाटलांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. तर दुसरीकडे प्रभाकर पाटील यांनीही २०२४ च्या दृष्टीकोनातून मतदारसंघ पिंजून काढण्याचा चंग बांधला आहे. यामुळे २०२४ ला पुन्हा दोन पाटलांमध्ये तासगावच्या वर्चस्वासाठी संघर्ष होणार आहे. त्याची प्रचिती आतापासूनच दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in