Sangli News : ...म्हणून पालकमंत्र्यांच्या गावातच नागरिकांनी उपसलं आंदोलनाचं हत्यार!

Bjp Leader Suresh Khade News : राज्यात आणि देशात सत्ता असणाऱ्या भाजप नेत्याच्या गावातच विकासकामांची बोंब...
suresh khade
suresh khadeSarkarnama

संभाजी थोरात

BJP News : भाजपचे मिरजचे आमदार व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगारमंत्री सुरेश खाडे यांचं मूळ गाव असलेल्या पेड (ता. तासगाव) या ठिकाणीच ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलन छेडलं आहे. या गावातील काही भागात सांडपाण्याची व्यवस्था नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं.

suresh khade
MVA News : शुभांगी पाटलांच्या उमेदवारीवरुन आघाडीत बिघाडी? काँग्रेसचं ठरलं पण राष्ट्रवादी तळ्यात मळ्यात...

राज्यात आणि देशात सत्ता असणाऱ्या पक्षाचे सुरेश खाडे (Suresh Khade) नेते आहेत. त्यांच्या गावात विकास कामांबाबत गावातील ग्रामस्थ नाराज असल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. पेड गावामध्ये वरची गल्ली याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झालेले दिसून आले. यामुळे आज पेड येथील ग्रामपंचायतीवर आंदोलन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

suresh khade
Satyajit Tambe : मी वादळ शांत होण्याची वाट पाहतोय; सत्यजीत तांबेंचे महत्वाचे विधान

यावेळी गावातील तासगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रभाकर पाटील,खरेदी विक्री संघाचे चेअरमन विलास पाटील,ग्रामपंचायतिचे सदस्य राजेंद्र शेंडगे,पेड मल्हारराव वि.वि.कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन विजय शेंडगे, अभिजित शेंडगे,विश्वास शेंडगे,अविनाश शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

मात्र, आता संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतल्यानंतर प्रशासन घडबडून जागे झाले. आंदोलनाच्या एक दिवस आधी आंदोलकांना भेटून दोन महिन्याचे गटारींचे काम पूर्ण करू असे लेखी पत्र देण्यात आले.या पत्रामुळे पूर्वनियोजित आंदोकांनी ग्रामपंचतीवर चिखलफेक न करता.फक्त घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करत आंदोलन केले.

मात्र येत्या दोन महिन्यात गटाराचे काम पूर्ण झाले नाही तर, तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी बोलतांना अभिजित शेंडगे यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in