
Sangali Politics : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिंदे-फडणवीस सरकारच्या निशाण्यावर आले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणी जयंत पाटील यांच्या चौकशीला स्थगिती देण्यात आली होती. आता शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारने ही स्थगिती उठवली आहे. राज्य सरकारने बँकेतील कर्ज वाटपातील अनियमितता, बँकेच्या कामकाजातील गैरव्यवहार आणि नोकर भरतीतील घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर जयंत पाटील (Jayant Patil) यांची सत्ता आहे. त्यामुळे बँकेतील नोकर भरतीपासून अन्य व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचे आरोप पाटील यांच्यावर होत आहे. जयंत पाटील यांचे निकटवर्तीय दिलीप पाटील हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना बँकेतील नोकरभरती झाली होती. या नोकरभरतीत घोटाळ्या झाल्या आरोप तेव्हापासून करण्यात आला होता.
बँकेतील गैरव्यवहार, थकीत कर्जे, नोकरभरती आदी मुद्यांच्या अनुषंगाने 2012 मध्ये बँकेत प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. प्रशासकांनी तीन वर्षातच बँकेची आर्थिक स्थिती सुधारत बॅंकेला 'अ' ऑडिट वर्ग मिळवून दिला. 2015 नंतर पुन्हा बॅंकेत पुन्हा दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सत्ता आली. पण या संचालक मंडळाने पूर्वीच्या कारभाराचा कोणताही बोध न घेता, नोकरभरती, फर्निचर, मालमत्ता खरेदी, बोगस कर्जवाटप, संगणक खरेदी, दुरुस्ती, वनटाईम सेटलमेंट इ.मध्ये मोठा भ्रष्टाचार व गैरव्यवहार केला, असा स्थानिकांकडून आरोप करण्यात आला. या आरोपांप्रकरणी पाटील यांची चौकशीचे आदेश होते. महाविकास आघाडी सरकारने या चौकशीला स्थगिती दिली. त्यानंतर आता शिंदे-फडणवीसांनी
2019 मध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती प्रक्रिया राबवण्यात आली. पण भरती प्रक्रिया राबवताना कायदेशीर नोकरभरतीच्या नियमावलीचा अवंलब करण्यात आला नाही. भरतीसाठी ज्या संस्थेने ऑनलाईन परिक्षा घेतली आहे, ती संस्थाही सापडत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. सहकार कायद्यांतर्गत कर्जदार संस्थांची मालमत्ता विक्री, संस्था, कंपनी व महिला बचत गटाचे 60 कोटींची कर्जे रद्द करणे, संचालकांच्या कारखान्यास बेकायदेशीरपणे 32 कोटीचे कर्ज देणे, महांकाली कारखान्याची कर्ज वसुली न करणे, स्वप्नपूर्ती शुगर्स कारखान्यास चुकीच्या पद्धतीने 23 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचेही आरोप बॅंकेवर करण्यात आले आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.