आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर यांचे निधन

Sangli News| Anil Babar| गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते.
Sangli News|
Sangli News|

विटा : सांगलीच्या खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ६२ वर्षांच्या होत्या. शोभा बाबर यांना न्युमोनियाचा त्रास होत असल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज (३ ऑगस्ट) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती अनिल बाबर, जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती सुहास बाबर आणि माजी नगरसेवक अमोल बाबर ही दोन मुले असा परिवार आहे.

Sangli News|
Laxman Hake : शिवसेनेला आक्रमक ओबीसी चेहरा मिळणार ; लक्ष्मण हाके शिवबंधन बांधणार

आज सायंकाळी विटा आणि गार्डी च्या सीमेवर असलेल्या पवई टेक परिसरातील जीवन प्रबोधिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात शोभा बाबर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर आजारी असल्याने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र उपचारादरम्यान रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे संपूर्ण खानापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (२ ऑगस्ट) रात्री उशिरा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला भेट दिली. खासदार गिरीश बापट, आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा अनिल बाबर यांची विचारपूसही केली. यावेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, आमदार अनिल बाबर उपस्थित होते. याचवेळी त्यांनी डॉ. प्रकाश आमटे यांच्याही प्रकृतीची विचारपूस करत कुटुंबियांशीही संवाद साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in