"मंत्र्यांच्या P.A. ला पाकिट द्यावं लागतं" : लाचखोर शिक्षणाधिकाऱ्याच्या कथित दाव्याने खळबळ

Sangli | लाचखोर शिक्षणाधिकारी, अधीक्षकाचे निलंबनाचे प्रस्ताव
Bribe
Bribe sarkarnama

सांगली : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे लाचखोर शिक्षणाधिकारी विष्णू मारुती कांबळे आणि अधीक्षक विजयकुमार अशोक सोनवणे यांना शुक्रवारी (६ मे) १ लाख ७० हजार रूपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता कांबळे यांचा एक कथित व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यातील व्यक्ती कांबळे हेच असल्याचे सांगितले जात आहे. यात त्यांनी केलेल्या कथित दाव्याने राज्यातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

(Sangli education officer bribe case)

व्हिडीओमध्ये "मंत्र्यांच्या गाडीत पेट्रोल टाकावं लागतं. त्यांचे पी. ए. येतात, त्यांना पाकीट द्यावं लागतं. हॉटेलला मुक्कामी असले की रुमचे, ३ दिवस, ४ दिवस खाण्या-पिण्याचे भाडे द्यावं लागतं. दर १५ दिवसाला हे सगळं करावं लागतं, त्यांना आम्ही नाही म्हणू शकत नाही" असा संवाद ऐकू येत आहे. हा व्हिडीओ आणि व्हिडीओमधील व्यक्ती विष्णू कांबळे हेच असल्याचे सांगितले जात आहे. (Sangli crime news)

Bribe
प्रफुल्ल पटेलांचा नाना पटोलेंना धक्का! भाजपशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन

शुक्रवारी (६ मे) पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळवून देण्याच्या बदल्यात १ लाख ७० हजार रूपयांची लाच स्विकारताना विष्णू कांबळे आणि विजयकुमार सोनवणे या दोघांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. त्यानंतर शिक्षणाधिकारी आणि अधीक्षकांच्या घराची तपासणी करताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला तब्बल १३ लाख रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Bribe
राष्ट्रवादीने साथ सोडली; भाजपच्या मदतीने नाना पटोलेंनी बसवला काँग्रेसचा अध्यक्ष

यानंतर विष्णू कांबळे व अधीक्षक विजयकुमार अशोक सोनवणे यांच्याबाबत झालेल्या कारवाईचा अहवाल लाचलुचपत विभागाकडून आलेला आहे. त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे, त्यानुसार पुढील कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र डुडी यांनी
दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com