'स्वाभिमानी'च्या इशाऱ्यानंतर सांगली जिल्हा बँकेची माघार! विषय गुंडाळला
Sangli jillha Bank electionsarkarnama

'स्वाभिमानी'च्या इशाऱ्यानंतर सांगली जिल्हा बँकेची माघार! विषय गुंडाळला

Sangli DCC Bank | Swabhimani Shetakari Sanghtana | : बँकेचे अध्यक्ष आणि आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले...

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सांगली जिल्हा बँकेने माघार घेतली आहे. बँकेचे अध्यक्ष आणि राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतुन बड्या नेत्याच्या संस्थांचे थकीत कर्ज ‘राईट ऑफ' करण्याचा विषय वगळला आहे. नाबार्ड आणि सहकार खात्याकडे प्रस्ताव पाठवून त्यांच्या मान्यतेनंतरच याबाबत विचार केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

बचत गट, पतसंस्थासह १८९ बड्या नेत्याच्या संस्थांचे थकीत कर्ज ‘राईट ऑफ' करण्याचा प्रस्ताव काही दिवसांपासून सांगली जिल्हा बँकेच्या विचाराधिन होता. हा विषय बँकेच्या आज होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार होता. मात्र राईट ऑफ आणि बड्या नेत्यांच्या व्याज माफीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हा बँकेच्या कार्यालयासमोर बोंब ठोको आंदोलन करणार असल्याचा आणि विशेष सर्व साधारण सभेत घुसून सभा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. तसेच सभासदांनी नेत्यांच्या कर्ज आणि व्याज माफी ठरावाला विरोध करावा, जे विरोध करणार नाहीत त्यांच्याही घरावर मोर्चे काढण्याचा इशारा देण्यात आला होता.

Sangli jillha Bank election
राजू शेट्टी - चंद्रकांत पाटील यांची 'ती' गुप्त भेट झाली का?

या इशाऱ्यानंतर माध्यमांशी बोलताना बँकेचे अध्यक्ष आणि आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, थकीत कर्ज ‘राईट ऑफ' करण्याचा सर्वसाधारण सभेतील विषय वगळला आहे. हा निर्णय तात्पुरता स्थगित ठेवण्यात आला आहे. हा प्रस्ताव आता नाबार्ड आणि सहकार खात्याकडे पाठवून त्यांच्या मान्यतेनंतरच याबाबत विचार केला जाईल. तसेच ओटीएस दिल्यास त्या संस्थांना यापुढे कर्ज देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बँकेच्या या माघारीच्या निर्णयानंतही स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनावर ठाम आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in