Sangali Politics: जयंत पाटील अॅक्शन मोडमध्ये; कोपरा सभेतून मोर्चेबांधणीला सुरुवात

Jayant Patil| गेल्यावेळी झालेला निष्काळजीपणा राहणार नाही, याची पुरेपुर दक्षता घेतली जात आहे.
Jayant Patil|
Jayant Patil|sarkarnama

सांगली : राज्यसरकारने जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडण्याबाबतची अधिकृत घोषणा केल्यानंतर आता सर्व नेतेमंडळी अॅक्टिव्ह मोडमध्ये आल्याचे दिसत आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हेदेखील सावध झाले आहेत. गेल्यावेळी इस्लामपूर नगरपालिकेत थेट नगराध्यक्ष निवडीत झालेल्या पराभवानंतर यंदा त्यांनी गल्ली- कोपरा सभांचा धडाका लावला आहे.

ओबीसी आरक्षणामुळे लांबलेला निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी मतदारांशी थेट संपर्क साधत त्यांच्या अडीअडचणींची माहिती घेताना दिसत आहेत. या निमित्ताने त्यांनी संभाव्य उमेदवारांची चाचपणीही सुरू आहे. राज्यातील बदलत्या राजकीय स्थितीमुळे जयंत पाटीलही चांगलेच सावध झाले आहेत. त्यांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून विरोधकांच्या हाती सत्ता देऊनही रस्ते, पाणी, गटारे या मूलभूत सुविधा पुरविण्यात ते अपयशी झाले, पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात मिळालेल्या निधीतून शहरातील रस्ते, गटारांची कामे हाती घेण्यात आली असून वाघवाडी, कारखाना आणि बहे या जोडरस्त्याची कामे दर्जेदार पद्धतीने सुरू असल्याचे ते सांगताना दिसत आहेत. तसेच, विकासासाठीच राष्ट्रवादीला साथ द्या, असे आवाहन त्यांनी सांगलीच्या नागरिकांना केलं आहे.

Jayant Patil|
साडेतीन हजारांची लाच घेतांना वेतन पथक अधीक्षक ACB च्या जाळ्यात

इस्लामपूर हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. तो आपल्याच ताब्यात राहिला पाहिजे यासाठी जयंत पाटील यांनी गल्ली बोळात, प्रत्येक प्रभागात संपर्क सभा, बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसांपासून त्यांनी जवळपास ३४ कोपरा सभा घेतल्या आहेत. या सभांच्या माध्यमातून ते मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. त्यांच्या अडीअडचणीची माहिती घेऊन सोडविण्याचे आश्वासन देत आहेत. त्याबरोबरच आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उमेदवारांची चाचपणीही सुरू केली आहे. कोणत्याही स्थितीत राज्यातील सत्ताबदलाचा इस्लामपूरवर परिणाम होणार नाही आणि गेल्यावेळी झालेला निष्काळजीपणा राहणार नाही, याची पुरेपुर दक्षता घेतली जात आहे.

दरम्यान, राज्यात पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेना सत्तेत असताना जयंत पाटील यांच्या सर्व विरोधकांनी एकत्र येऊन भाजप पुरस्कृत विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली. त्यावेळी भाजपचे निशिकांत भोसले-पाटील यांनी राष्ट्रवादीचे विजय पाटील यांचा पराभव केला. विशेष म्हणजे त्यांनी नगरसेवकांची संख्याही बरोबरीत पटकावली. अपक्ष म्हणून निवडून आलेले दादासाहेब पाटील राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाल्याने त्यांची उपनगराध्यक्ष पदी निवड झाली. नगराध्यक्ष निवडीमध्ये राष्ट्रवादी उमेदवाराचा झालेला पराभव म्हणजे विधानसभा निवडणुकीत जयंत पाटलांनाच आव्हान, असे मानले जात होते. त्यावेळीही भाजपनेही निशिकांत पाटील यांना ताकद दिली होती.

आताही राज्यात झालेल्या सत्ताबदलाने भाजप पुरस्कृत विकास आघाडी स्थापन करण्याच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. याच राष्ट्रवादी वगळता सर्वच राजकीय पक्ष एकत्र येऊ शकतात. अशात शिवसेनेचे आनंद पवार यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांचा हा निर्णय विकास आघाडीला पोषकच ठरणार आहे. त्यामुळे जयंत पाटील विरुद्ध अन्य पक्ष, गट असाच सामना आगामी इस्लामपूर नगरपालिका निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com