Sandesh Karle : नेप्ती उपबाजार समितीत राजकीय गुंडागर्दी

कांदा लिलावात आजही भाव पडल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मार्केट कमिटी बंद केली.
Sandesh Karle
Sandesh KarleSarkarnama

अशोक निंबाळकर

Sandesh Karle : अहमदनगरची एमआयडीसी हप्तेखोरीमुळे शेवटच्या घटका मोजत आहे. तेथे गुंडागर्दी करणारे लोक आता नेप्ती बाजार समितीत घुसले आहेत. कांदा व्यापाऱ्यांवर त्यांचा दबाव आहे. परराज्यातील व्यापाऱ्यांना ते लिलावासाठी येऊ देत नाहीत. दुसरीकडे बहुतांशी आडतेच व्यापारी बनलेत. आंदोलनानंतर बाजारभाव वाढतात कसे, असा आरोप करताना शिवसेनेचे (ठाकरे) उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांनी वेळ आल्यावर त्यांची नावे जाहीर करण्याचा इशारा दिला.

कांदा लिलावात आजही भाव पडल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मार्केट कमिटी बंद केली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर लिलाव पूर्ववत झाले. त्यानंतर कांद्याला चांगला भाव मिळाला. सायंकाळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत बाजार समितीत सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराबाबत टीकास्त्र सोडले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, माजी सभापती रामदास भोर, तालुका प्रमुख राजेंद्र भगत, प्रकाश कुलट, जिवा लगड, सुशील कदम आदी उपस्थित होते.

Sandesh Karle
पोलिसांच्या नेमबाजीमुळे कार्ले गाव दहशतीत

नेप्ती उपबाजारात कांदा लिलाव करताना व्यापारी कडी करतात. ते ठरवून कांद्याचे भाव पाडतात. एकावेळी जास्तीत पाच ठिकाणी लिलाव व्हायला हवेत. परंतु तसे न होता. पंधरा-वीस ठिकाणी लिलाव घेतले जातात. त्यामुळे लिलावात स्पर्धाच होत नाही. पूर्वी परराज्यातील व्यापारी लिलावासाठी यायचे. त्यांच्यावर दबाव असल्याने ते लिलावासाठी येतच नाही. परिणामी स्पर्धा होत नसल्याने भाव पडतात, असा आरोप कार्ले यांनी केला. अतिवृष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यांनी जिवाचे रान करून कांद्याचे पीक घेतले आहे. त्याची अशी लूट होत असेल तर आवाज उठवावाच लागेल, असेही त्यांनी सांगितले.

Sandesh Karle
'मातोश्री'वरील बैठक संंपली; उद्धव ठाकरेंचा समर्थकांना महत्त्वाचा संदेश...

सध्या बाजार समितीवर प्रशासक आहे. त्यांचा कारभारावर कोणताच अंकुश नाही. त्यांच्याकडे कोणत्या भावाने किती वक्कल गेले, याची माहितीच नाही. राहुरीसह इतर बाजार समितीत कारभार पारदर्शक आहे. इथे वेगळी स्थिती आहे. एखाद दुसऱ्या वक्कलला चांगला भाव काढायचा आणि नंतर उर्वरित कांदा पडत्या भावाने घ्यायचा असा फंडा आहे.

- रामदास भोर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in