समृद्धी महामार्ग जाणार गडचिरोलीला : राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

आता समृद्धी महामार्ग नक्षलवादी भागांसह तीन राज्यांतूनही जाणार आहे.
Samrudhi Mahamarg News, State government decision on Samrudhi Mahamarg News
Samrudhi Mahamarg News, State government decision on Samrudhi Mahamarg NewsSarkarnama

मुंबई - विधीमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे. विधानसभेतील लक्षवेधीत आज धर्मराव बाबा आत्राम यांनी बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूरच्या पुढे नेऊन नक्षलवादी भागालाही जोडण्याची मागणी केली. यावर मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी उत्तर देताना मुंबई ते नागपूर असलेला समृद्धी महामार्ग गडचिरोलीत नेण्यासाठी 31 मार्चला निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता समृद्धी महामार्ग नक्षलवादी भागांसह तीन राज्यांतूनही जाणार आहे. ( Samrudhi Highway go to Gadchiroli: State government took a big decision )

धर्मराव बाबा आत्राम यांनी मांडलेल्या लक्षवेधीत त्यांनी नक्षलवादी व दुर्गम आदिवासी भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुंबईपासून नागपूरपर्यंत गेलेला समृद्धी महामार्ग भंडारा, गोंदिया व गडचिरोली भागालापर्यंत नेण्याची मागणी केली. याला उत्तर देताना मंत्री एकनाथ शिंद म्हणाले, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटरचा आहे. गोंदिया, भंडारा, गडचिरोली हा भाग नक्षलवादी, दुर्गम व आदिवासी भाग आहे. या भागात रस्त्यांचे जाळे पोचणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारने समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. (Samrudhi Mahamarg News Updates)

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, नागपूर ते गडचिरोली हा समृद्धी महामार्ग तीन टप्प्यात होईल. यात नागपूर ते भंडारा, भंडारा ते गोंदिया व गोंदिया ते गडचिरोली असे टप्पे असतील. या तीनही टप्प्यातील कामे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ( एमएसआरडीसी ) होतील. या तीनही टप्प्यांतील कामांची निविदा प्रक्रिया 31 मार्च 2022 ला सुरू होईल. हा रस्ता तीन राज्यांतून जाणार आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com