"संभाजीराजेंना कधीही भाजपचा प्रचार करायला लावला नाही" : फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

Sambhajiraje Chhtrapati | Shivsena | BJP : उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंपुढे शिवसेनेत येण्याची आणि शिवसेनेचा प्रचार करण्याची ऑफर
Sambhajiraje Chhatrapti | Devendra Fadanvis, Sambhaji Raje met Fadnavis, Sambhajiraje Chhatrapti Latest News, Sambhaji Raje met Devendra Fadnavis
Sambhajiraje Chhatrapti | Devendra Fadanvis, Sambhaji Raje met Fadnavis, Sambhajiraje Chhatrapti Latest News, Sambhaji Raje met Devendra Fadnavis Twitter/@SambhajirajeChhatrapti

इंदापूर : राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhtrapati) यांनी अपक्ष म्हणून उडी घेतली आहे. मात्र सहावी जागा शिवसेना (Shivsena) लढविणार असल्याने संभाजीराजे यांनी काल मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. यात उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंपुढे शिवसेनेत येण्याची आणि शिवसेनेचा प्रचार करण्याची ऑफर दिल्याची माहिती आहे. यावर बोलताना राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला जोरदार प्रत्यूत्तर दिले. (Devendra Fadnavis latest News)

फडणवीस म्हणाले, संभाजी राजेंना आम्ही राष्ट्रपती कोट्यातून खासदार केले, मात्र त्यांना कधीही पक्षाचा प्रचार करायला लावला नाही. तसेच संभाजीराजे यांना पाठिंबा देणे हे केवळ आमचे कर्तव्य आहे का? त्यांचे नाही का? मग त्यांनी ती द्यावी. जर शिवसेनेला संभाजीराजे यांना उमेदवारी द्यायची आहे तर ती सहावी जागा का? ओरिजनल जागा द्यावी. भाजपच्या पाठिंब्याबाबत जो काही निर्णय आहे तो पक्षाचे हायकमांड करेल असेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस आज त्यांचे कुलदैवत तीर्थक्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे आले होते. यावेळी भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्यांच्या सत्कारासाठी भव्य स्वागत सभेचे आयोजन करण्यात आले होते. फडवणीस यांचे नीरा नरसिंहपूर येथे हेलिपॅडवर आगमन झाल्यानंतर त्यांनी कुलदैवत श्री. लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी इंदापूर भाजपच्या वतीने फडणवीस यांचा भव्य सत्कार देखील करण्यात आला.

काय आहेत संभाजीराजे छत्रपतींपुढील अटी?

  • संभाजीराजे छत्रपती शिवसेनेच्या सहकार्याने महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले तरी संभाजीराजे राज्यसभेत शिवसेनेच्या खासदारांसोबतच असणार.

  • संभाजीराजे राज्यसभेत शिवसेनेच्या धोरणात्मक निर्णायावर सोबत राहणार. राज्यसभेतील विधेयकं आणि इतर राजकीय निर्णयांशी संंबंधित संभाजीराजेंची भूमिका ही शिवसेनेची जी अधिकृत भूमिका असेल तिच असणार.

  • अगामी सर्व निवडणुकांमध्ये संभाजीराजे छत्रपती शिवसेनेचा प्रचार करणार.

  • शिवसेनेच्या सहकार्याने आणि महाविकास आघाडी पुरस्कृत राज्यसभेचे उमेदवार म्हणून संभाजीराजे छत्रपती असले तरी ते शिवसेनेचे २३ वे खासदार म्हणूनच कार्यरत रहाणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com