संभाजीराजे छत्रपती मन मोकळं करणार; मोठा गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत

Sambhajiraje chhatrapati | भाजप किंवा महाविकास आघाडी कोणाकडूनही संभाजीराजे यांना पाठिंबा नाही
Sambhajiraje Chhatrapati News, Kolhapur News, Political News
Sambhajiraje Chhatrapati News, Kolhapur News, Political NewsSarkarnama

कोल्हापूर : राज्यसभा निवडणुकीत कात्रीत सापडलेले माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhtrapati) मोठा गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत आहेत. उद्या (शुक्रवारी) त्यांनी पुढील भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. यात ते राज्यसभा निवडणुकीवर भाष्य करण्याची शक्यता आहे. १२ मे रोजी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढविण्याची घोषणा केल्यानंतर होणारी त्यांची ही पहिलीच पत्रकार परिषद आहे. यामुळे यात ते भाजप, महाविकास आघाडी आणि इतर अपक्ष आमदारांबाबत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Sambhajiraje Chhatrapati News)

संभाजीराजे छत्रपती माघार घेणार?

दरम्यान संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhtrapati) राज्यसभा निवडणुकीतून माघार घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाही भाजप (BJP), महाविकास आघाडी किंवा अन्य अपक्ष आमदार यांच्यापैकी कोणीही संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhtrapati) यांना पाठिंबा जाहीर केलेला नाही.

केवळ अपक्ष आमदार महेश बालदी आणि मनसे आमदार राजू पाटील यांनीच संभाजीराजे यांना पाठिंबा जाहिर केला आहे. याशिवाय अर्ज दाखल करण्यासाठी लागणारे १० आमदारांचे अनुमोदनही संभाजीराजे छत्रपती यांना जमवता आलेले नाही. त्यामुळेच उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच संभाजीराजेंवर मोठी नामुष्की ओढावली असल्याचे बोलले जात आहे.

Sambhajiraje Chhatrapati News, Kolhapur News, Political News
संभाजीराजे छत्रपतींची राज्यसभेच्या रिंगणातून माघार; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच नामुष्की

संभाजीराजे छत्रपती यांनी १२ मे रोजी पुण्यात पत्रकार परिषद घेवून राज्यसभेच्या सहाव्या जागेवर अपक्ष म्हणून उतरण्याची घोषणा केली होती. यासाठी त्यांनी भाजप आणि महाविकास आघाडीकडे पाठिंबा मागितला होता. तसेच अपक्ष आमदारांना अनुमोदन देण्याचे आवाहनही केले होते. मात्र प्रत्यक्षात सहावी जागा लढविण्यासाठी लागणारे संख्याबळ महाविकास आघाडीत शिवसेनेच्या मागे असल्याने त्यांनी अपक्ष अर्ज दाखल करत शिवसेना पुरस्कृत उमेदवार होण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला होता. (Rajyasabha Election 2022 News Updates)

मात्र शिवसेनेने संभाजीराजे यांना शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरण्याची अट ठेवली. परिणामी संभाजीराजे छत्रपती यांची कोंडी झाली. पण त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार देवून अपक्ष निवडणूक लढविण्याची भूमिका कायम ठेवली. अखेरीस शिवसेनेने सहावा उमेदवार म्हणून संजय पवार यांच्या नावाची घोषणा केली अन् आज त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जोडीने उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे ते राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज न भरता लवकरच माघार घेणार असल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com