संभाजीराजेंची मोठी खेळी : 'मविआ' अन् भाजपच्या शिल्लक मतांवर मांडलं राज्यसभेचं गणित

Sambhaji Raje Chhtrapati : राज्यसभेसाठी सर्वपक्षीयांनी मदत करण्याचे आवाहन
Chhatrapati Sambhajiraje Latest News in Marathi, Political News in Marathi
Chhatrapati Sambhajiraje Latest News in Marathi, Political News in MarathiSarkarnama

पुणे : जुलैमध्ये रिक्त होणाऱ्या ६ जागांची राज्यसभेची निवडणूक आपण अपक्ष लढवणार असल्याची घोषणा माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी केली. ते पुण्यात बोलत होते. यावेळी त्यांनी निवडणूक लढवताना राज्यसभेसाठी लागणारी आमदारांची मत आणि सध्या सर्व पक्षांकडे असलेली मत यांचे गणित मांडले आणि आपण केलेल्या कामाची दखल घेवून सर्वपक्षीयांनी राज्यसभेवर पाठवा असे आवाहनही केले. (Sambhajiraje Chhatrapati Latest News in Marathi)

संभाजीराजे छत्रपती यांनी मांडलेलं गणित नेमकं आहे?

राज्यसभा खासदार निवडणुकीसाठी एक सुत्र ठरविण्यात आलेले आहे. यानुसार राज्यातील एकूण विधानसभा सदस्यांची संख्या ÷ राज्यसभेच्या रिक्त जागा +१ = आलेली संख्या + १ = आलेली संख्या हा विजयी उमेदवाराचा कोटा.

या सुत्रानुसार महाराष्ट्राच्या संख्येचं गणित

विधानसभेचे सदस्य २८८ ÷ राज्यसभेच्या रिक्त जागा ६ + १.

म्हणजे २८८ ÷ ७ = ४१ + १= ४२ मत.

  • राज्य विधानसभेचे सध्याचे बलाबल काय सांगते?

1. महाविकास आघाडीकडे १६९ आमदार

महाविकास आघाडीकडे १६९ आमदारांचे संख्याबळ आहे. यात शिवसेना ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ५३, काँग्रेस ४४, बहुजन विकास आघाडी ३, समाजवादी पक्ष २, प्रहार १, स्वाभिमानी शेतकरी संघटना १, शेकाप १, अपक्ष ८ अशा आमदारांचा समावेश आहे. या संख्याबळानुसार महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे ४२*३ = १२६ म्हणजे ३ खासदार सहज निवडून आणू शकते. तर शिल्लक मत २७ आणि इतर अधिक अपक्ष असे १६ मिळून चौथा खासदार देखील निवडून येण्याची शक्यता आहे.

Chhatrapati Sambhajiraje Latest News in Marathi, Political News in Marathi
संभाजीराजेंची राजकीय दिशा ठरली! निवडणूक आणि पक्षाविषयी दोन मोठ्या घोषणा

2. भाजपप्रणित संख्याबळ ११३ :

तर विरोधकांचे संख्याबळ हे ११३ आहे. यात भाजप १०६, रासप १, जनसुराज्य पक्ष १ आणि अपक्ष ५ अशा आमदारांचा समावेश आहे. या संख्याबळानुसार भाजप ४२*२ = ८४ म्हणजे २ जागा सहज निवडून आणू शकतो. त्यानंतर त्यांच्याकडे स्वतःची २२ आणि विरोधकांची ७ मत शिल्लक राहत आहेत.

3. ४ आमदार तटस्थ आणि १ जागा रिक्त

याशिवाय इतर म्हणजे जे आमदार तटस्थ आहेत त्यांचे संख्याबळ ४ आहे. यात एमआयएम २, कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) १ आणि मनसे १ अशा आमदारांचा समावेश आहे. तर शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाने एक जागा रिक्त आहे.

Chhatrapati Sambhajiraje Latest News in Marathi, Political News in Marathi
Ramesh Latke| शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन; दुबईत घेतला अखेरचा श्वास

संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास आघाडीची शिल्लक २७ मत, भाजपप्रणित शिल्लक २२ मत आणि इतर आमदारांचे अनुमोदन याच गणितावर राज्यसभेच्या सहाव्या जागेवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या कामाची दखल घेवून सर्वपक्षीयांनी आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी विनंती केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com