संभाजीराजेंची राजकीय दिशा ठरली! निवडणूक आणि पक्षाविषयी दोन मोठ्या घोषणा

Sambhajiraje Chhatrapati : पुण्यातून संभाजीराजे छत्रपती यांच्या दोन मोठ्या घोषणा. नवी पक्षाची स्थापना
Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi News, Kolhapur Latest Marathi News
Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi News, Kolhapur Latest Marathi News Sarkarnama

पुणे : जुन-जुलैमध्ये रिक्त होत असलेल्या ६ जागांची राज्यसभेची निवडणूक आपण लढवणार असून, ती अपक्ष लढवणार असल्याची घोषणा माजी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार संभाजीराजे यांनी केली. ते पुण्यात बोलत होते. आपण केलेल्या कामाची दखल घेवून मला राज्यसभेवर पाठवा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी संभाजीराजे यांनी शिवप्रेमी आणि शाहुप्रेमी जनतेला एकाच छताखाली आणण्यासाठी 'स्वराज्य' या संघटनेची स्थापना करणार असल्याचेही घोषणा केली. तसेच आपण आजपासून कोणत्याही पक्षाचा सदस्य नसून यापुढच्या काळात देखील कोणत्याही पक्षात जाणार नाही नसल्याचेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. (Sambhajiraje Chhatrapati Latest News in Marathi)

संभाजीराजे छत्रपतींची (Chhatrapati Sambhajiraje) राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदारकीची मुदत तीन मे रोजी संपली आहे. त्यानंतर नुकतेच त्यांनी नवी आपण राजकारणात उतरणार असून लवकरच आपली राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यावरून ते कोणत्या राजकीय पक्षात जाणार की एकला चलो रे ची भूमिका घेणार याबाबत राजकीय वर्तूळात तर्कवितर्क लढवले जात होते. त्यानंतर त्यांनी १२ मेे रोजी आपण पुण्यातून आपली पुढची भूमिका मांडणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार त्यांनी भूमिका मांडली असून आता निवडणूक आणि पक्षाविषयी त्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi News, Kolhapur Latest Marathi News
Ramesh Latke| शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन; दुबईत घेतला अखेरचा श्वास

संभाजीराजे छत्रपती नेमके काय म्हणाले?

इतके वर्ष महाराष्ट्रातील लोकांनी छत्रपती घराण्यावर प्रेम केले. या प्रेमामुळेच मी संपूर्ण महाराष्ट्र फिरु शकलो. लोकांना भेटू शकलो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांचे विचार पोहचवण्याची संधी मिळाली. याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील हे समजून घेण्यासाठी, ते सोडवण्यासाठी संधी मिळाली. यानंतर माझ्या या कामाची दखल घेवून मला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटायला बोलावले, विनंती करुन राज्यसभेची खासदारकी स्विकारायला लावली.

पण खासदारकीनंतरही मी कायम छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारांप्रमाणेच माझी वाटचाल केली. सहा वर्षांच्या खासदारकीच्या काळात मी अनेक समाजोपयोगी, लोकोपयोगी कामे केली. यात पहिल्यांदा व्यापकपणे दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरु केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती देशपातळीवर सुरु केली. शिवराज्याभिषेक सोहळा जगव्यापी केला. रायगडवर २५ देशांचे राजदुत आणले. ५ डिसेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडावर आले. नतमस्तक झाले. गडकोट किल्ल्यांचे संवर्धनासाठी पुढाकार घेतला.

Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi News, Kolhapur Latest Marathi News
"प्रत्येक न्यायालयांकडून सातत्याने चपराक खावून CM ठाकरेंचे दोन्ही गाल सूजले"

याशिवाय संसदेतील माझ्या प्रत्येक भाषणात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहु महाराज यांचा उल्लेख होता. काही वर्षांपूर्वी आझाद मैदानात मराठा समाजाने मला नेतृत्व दिले, आणि त्यांची आक्रमकता कमी करु शकलो, त्यानंतर ते माघारी फिरले. अन्यथा काहीही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होती. अशीच भूमिका मी मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर देखील घेतली. समाजाला शांत राहण्याचे आवाहन करत समाजोपयोगी भूमिका घेतली. महापूरावेळी देखील नौदलाच्या १४ तुकड्या घेवून येत कोल्हापूरला वाचवण्याचा प्रयत्न केला.

हे सगळं सत्ता हातात असल्यामुळे शक्य झाले. इथून पुढेही जर आपल्याला काम करायचे असेल तर राजसत्ता हातात हवी. त्यामुळे मी दोन निर्णय घेतले आहेत. यातील पहिला निर्णय आहे तो राज्यसभेचा. जुलैमध्ये राज्यसभेच्या ६ जागा रिक्त होत आहेत. यात २ जागा भाजप आणि ३ जागा महाविकास आघाडीला जाणार आहेत. मात्र सहावी जागा कोणत्याही पक्षाला एकट्याला जिंकणे शक्य नाही. त्यामुळे ही सहावी जागा मी लढवणार असून ती अपक्ष लढवणार आहे.

नव्या संघटनेची घोषणा :

संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी नव्या संघटनेची स्थापना केली. ते म्हणाले, आपण आजपासून कोणत्याही पक्षाचा सदस्य नसून यापुढच्या काळात देखील कोणत्याही पक्षात जाणार नाही. मात्र सगळ्यांना संघटित करण्यासाठी जिथे अन्याय होतो तिथे लढा देण्यासाठी मी आहे. त्यामुळे शिवप्रेमी आणि शाहुप्रेमी जनतेला एकाच छताखाली आणण्यासाठी 'स्वराज्य' या संघटनेची स्थापना करणार आहे. हा पहिला टप्पा आहे, भविष्यात ही संघटना राजकीय पक्ष झाला तरी त्याला हरकत नसावी. असं म्हणत त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केल्याचे संकेत दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com