शिवसेनेच्या बळकटीकरणाला संभाजी कदमांनी केली सुरवात

शिवसेना ( Shivsena ) अध्यक्ष तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या आदेशानुसार अहमदनगर ( Ahmednagar ) शहरात शिवसेनेचे कार्यकर्ते संभाजी कदम यांच्यावर पुन्हा एकदा शहर प्रमुख पदाची धुरा सोपविण्यात आली आहे.
sambhaji Kadam
sambhaji KadamSarkarnama

अहमदनगर : शिवसेनेचे अहमदनगर शहर प्रमुख दिलीप सातपुते यांचे नाव बायोडिझेलच्या वैधविक्री प्रकरणात नाव पुढे आले. त्यामुळे त्यांना पदापासून दूर करण्यात आले. शिवसेना ( Shivsena ) अध्यक्ष तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या आदेशानुसार अहमदनगर ( Ahmednagar ) शहरात शिवसेनेचे कार्यकर्ते संभाजी कदम यांच्यावर पुन्हा एकदा शहर प्रमुख पदाची धुरा सोपविण्यात आली आहे. Sambhaji Kadam started the strengthening of Shivsena

पक्षाच्या आदेशानुसार संभाजी कदम यांनी नगर शहरातील शिवसेनेचे बळकटीकरण, पक्षाची संघटनात्मक बांधणी, नवीन शाखांसह जुन्या शाखांचे नूतनीकरण आदींवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यादृष्टीने पदाधिकारी, कार्यकर्तेव विभाग प्रमुखांच्या भेटीगाठी त्यांनी सुरू केल्या आहेत.

sambhaji Kadam
बेकायदा बायोडिझेल विक्रीत शिवसेनेचा शहर प्रमुखच मास्टरमाईंड

संभाजी कदम यांनी यापूर्वीही अनिल राठोड यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली शहर प्रमुख म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. त्या काळात संपूर्ण शहरात शिवसेना कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण झाले होते. त्यादृष्टीनेच संभाजी कदम यांनी नव्याने संघटना बळकटीकरणासाठी पावले टाकली आहेत.

संभाजी कदम म्हणाले, अहमदनगर शहरात विविध भागांमध्ये शिवसेनेच्या अनेक शाखा आहेत. शहराच्या मध्यवर्ती परिसरासह सावेडी, बोल्हेगाव, नागापूर, केडगाव व कल्याण रस्ता अशा उपनगर परिसरामध्ये शिवसेनेला व हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा वर्ग मोठा आहे. शहरातील शिवसेनेचे सर्वेसर्वा स्व. अनिल राठोड यांनी अनेक वर्षे सामान्य नागरिक व प्रत्येक घटकातील नागरिकांचे प्रश्न सोडविले. शहराच्या प्रत्येक कानाकोपर्‍यात त्यांनी शिवसेना रुजवली. या माध्यमातून शहरात शिवसेनेचे मोठे जाळे निर्माण केले. स्व. अनिल राठोड यांनी सर्वसामान्यांसाठी, सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी ज्या पद्धतीने काम केले, त्याच पद्धतीने कार्यकर्त्यांना ताकद देऊन शहराच्या प्रत्येक भागात शिवसेना रुजविण्याचे, नव्याने शाखा तसेच जुन्या शाखांचे बळकटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती संभाजी कदम यांनी दिली.

sambhaji Kadam
ठेकेदार बोलतो आमदार जगताप यांच्या पत्रातून  : महापौर सुरेखा कदम 

ते पुढे म्हणाले की, अहमदनगर शहरामध्ये शिवसेनेला, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना मानणारा वर्ग मोठा आहे. शिवसेनेने पक्षाच्या स्थापनेपासून समाजकारण व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे याच मुद्द्यावर सर्वाधिक भर दिला आहे. आज राज्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आहे.

स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रसह नगरवासीयांच्याही शिवसेनेकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यातच अहमदनगर शहरामध्येही महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे या महापौर आहेत. त्यामुळे सामान्यांचे प्रश्न सोडवणे व शहरातील प्रत्येक भागातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी या पुढील काळात शिवसेनेचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी शहराच्या प्रत्येक भागात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले जाणार आहे. अहमदनगर शहर व उपनगर परिसरामध्ये शिवसेनेच्या शाखा आहेतच, यातील काही शाखांचे नूतनीकरण व बळकटीकरण केले जाणार आहे. काही भागात नव्याने शाखा सुरू केल्या जाणार आहेत.

sambhaji Kadam
अनिल राठोड मंत्री होणार होते : गडाख

उपनगर विभाग प्रमुखांच्या निवडी केल्या जाणार आहेत. शहराच्या अनेक भागातून नवीन कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील नागरिक पक्षाच्या कार्यात सक्रिय होण्यास तयार आहेत. त्यांनाही सामावून घेतले जाणार आहे. त्यादृष्टीनेच शहराच्या सर्व भागातील कार्यकर्तेव पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा करत आहे. पक्षातील जुने कार्यकर्ते, नव्याने येणारे कार्यकर्ते, सर्व नगरसेवक, पदाधिकारी, महिला आघाडी यासह सर्वांना बरोबर घेऊन पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे कदम यांनी सांगितले.

अनिल राठोड यांच्या निधनानंतर अहमदनगर शहरात शिवसेना संपणार, अशा चर्चा काहीजण घडवून आणत आहेत. मात्र, स्व. राठोड यांनी शहरामध्ये हजारो कार्यकर्त्यांची फौज उभी केली आहे. कोणी कितीही चर्चा घडवून आणल्या तरी सामान्यांच्या मदतीसाठी, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी अहमदनगर शहरात शिवसेना खंबीर आहे व यापुढील काळातही राहील. स्वर्गीय अनिल राठोड यांचे आशीर्वाद कायम शिवसैनिकांच्या पाठिशी आहेत. त्यांच्या विचारानुसार व त्यांना अभिप्रेत असलेले कार्य सर्व शिवसैनिक एकदिलाने यापुढील काळातही करत राहतील, असा विश्वासही संभाजी कदम यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com