समरजितसिंहांनी केली मुश्रीफ, सतेज पाटील, यड्रावकर, मंडलिक, कोरे यांची कोंडी

आता लक्ष नेतेमंडळींकडे लागले आहे
समरजितसिंहांनी केली मुश्रीफ, सतेज पाटील, यड्रावकर, मंडलिक, कोरे यांची कोंडी
samarjeetsinh ghatge-Hasan mushrif-satej Patil-vinay koreSarkarnama

कोल्हापूर : यंदाच्या हंगामात एफआरपी एकरकमी की टप्प्याटप्प्याने यावरून मतभेद आहेत. एकरकमी ‘एफआरपी’साठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘जागर एफआरपी’च्या माध्यमातून आंदोलन सुरू केले. शेट्टी यांच्या ऊस परिषदेकडे डोळे लावून बसलेल्या कारखानदारांची मात्र ‘शाहू-कागल’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा कोंडी करताना कारखानदार असलेल्या मंत्री, खासदार, आमदार यांनाच चपराक दिली आहे. (Samarjit Singh Ghatge's factory announced a one-time FRP)

महाराष्ट्रात तीन टप्प्यांत एफआरपी देण्याचा घाट घातला जात आहे. यावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन एफआरपी एकरकमीच हवी, अशी मागणी केली. त्या वेळी गोयल यांनीही एका टप्प्यातच एफआरपी देण्याचे आश्‍वासन दिले. दरम्यान, स्वाभिमानीनेही एफआरपीचे तुकडे होऊ देणार नाही. यासाठी ऐन हंगामात आंदोलन करावे लागले तरीही चालेल, अशी भूमिका घेऊन ऊस परिषदेचा अजेंडा ठरविला जात होता. यातच आज अध्यक्ष घाटगे यांनी शाहू कारखान्याकडून शेतकरी सभासदांना यंदाच्या हंगामात एकरकमी प्रतिटन दोन हजार ९९३ रुपये देणार असल्याची घोषणा करून संभाव्य कोंडीच फोडली.

samarjeetsinh ghatge-Hasan mushrif-satej Patil-vinay kore
मावळ गोळीबार झाला, तेव्हा शरद पवारांना जालियानवाला बाग हत्याकांड आठवले नाही?

घाटगे यांनी केलेल्या घोषणेमुळे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार संजय घाटगे, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के. पी. पाटील यांना चांगलीच चपराक बसली आहे. ‘शाहू-कागल’ला एकरकमी एफआरपी परवडते, मग इतरांना का नाही, असा प्रश्‍न आता उत्पादकांनाही पडू लागला आहे. शाहू कारखाना शेतकऱ्यांचे हित पाहतो, त्याचप्रमाणे इतरांनीही एकरकमी एफआरपी दिली पाहिजे, असा जनरेटा वाढण्याचीही भीती इतरांना आहे.

samarjeetsinh ghatge-Hasan mushrif-satej Patil-vinay kore
उपाध्यक्षपदाची खुर्ची संजय पाटलांच्या काकांना मिळणार की सत्यजित देशमुखांच्या?

‘शाहू’कडून दिवाळी भेट

यंदाच्या हंगामात एफआरपीचे तीन तुकडे केले जाणार, असा राज्य सरकारकडून घाट घातला जात असल्याची टीका भाजप नेत्यांकडून, तर केंद्राकडूनच एफआरपी टप्प्याटप्प्याने देण्यासाठी प्रस्ताव मागितल्याचे राज्य शासनाच्या प्रतिनिधींकडून सांगितले जात होते. केंद्राची भूमिका गोयल यांनी स्पष्ट केली. त्याचे तंतोतंत पालन करीत शाहू कारखान्याने खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे.

आता लक्ष नेत्यांकडे

शाहू कारखान्याने जाहीर केलेल्या एकरकमी एफआरपीनंतर आता ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय कोरे, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के. पी. पाटील हे एफआरपी देण्याबाबत कोणती भूमिका घेणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.