राज्यातील सत्ता बदलात आमदार आवताडेंनी साधली संधी; पण फायदा होणार का?

Samadhan Autade | BJP : आमदार आवताडे यांनी शहरासाठी काय योगदान दिले?
Samadhan Autade | Devendra Fadnavis
Samadhan Autade | Devendra Fadnavis Sarkarnama

मंगळवेढा : राज्यात झालेला सत्ता बदलाचा करेक्ट कार्यक्रम पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे (Samadhan Autade) यांच्यासाठी चांगलाच फायदेशीर ठरला आहे. नव्या सरकारकडून पंढरपूर नगरपालिकेला २ कोटी ३३ लाख आणि मंगळवेढा नगरपालिकेला दोन कोटी ५७ लाखांची निधी प्राप्त झाला आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आमदार आवताडे यांच्यासाठी हा निधी महत्त्वाचा ठरणार आहे. (Samadhan Autade | BJP Latest News)

पायाभूत सेवा व सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने पुरविण्यासाठी पंढरपूरला आणि मंगळवेढ्याला हा निधी मंजूर झाला. दोन्ही शहरातील नागरिकांना वीज, आरोग्य, शिक्षण, पाणी आदी सेवा व सुविधा उत्तम पद्धतीने पुरवता याव्यात यासाठी हा निधी नगर विकास विभाग, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसुचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी मंजूर झाला आहे.

निवडणूक आयोगाने नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर केला होता. पण आता निवडणूक कार्यक्रम पुढे गेला आहे. त्यामुळे आमदार आवताडे यांनी शहरासाठी काय योगदान दिले यावर सत्ताधाऱ्यांकडून आरोप झाल्यास अशा आरोपांना सामोरे जाण्यासाठी हा प्राप्त निधी आवताडे यांना उपयोगी ठरणार आहेत.

कोणती कामं मंजूर झाली आहेत?

मंगळवेढा शहरात विठ्ठल मंदिर सभागृह पेविंग ब्लॉक बसवणे, कल्याण प्रभू शेजारील महादेव मंदिरात सभामंडप, मरीआई मंदिर सभामंडप सनगर गल्ली साठे नगर येथे समाज मंदिर, खोमनाळ नाका येथे सांस्कृतिक भवन, भारत इंगळे सर ते अर्जुन हजारे कोपरा इंगळे गल्ली रस्ता व गटार,कारखाना चौक ते नागणेवाडी पाण्याच्या टाकी पासून पोलीस स्टेशन पर्यंतचा रस्ता कॉंक्रिटीकरण यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.

डॉक्टर अभिजीत सावंजी ते हॉटेल सावंजी पर्यंत बंदिस्त गटार बांधणे २० लाख, सनगर गल्ली ते सांगोला नाका रस्ता कॉंक्रिटीकरण, महादेव माने घर ते सार्वजनिक शौचालय पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण, राजू पवार घराजवळील नवरंग मंडळ श्रीकृष्ण नवरात्र मंडळात सभागृह, सुतार गल्ली येथे इंगळे वाडा ते देशमुख वाडा रस्ता कॉंक्रिटीकरण, गोवे गल्लीतील कापूर विहिरी वरती पत्रा शेड करणे कंपाउंड, अशोक शेळके घराजवळ समाज मंदिर (बागेजवळ), शशिकांत चव्हाण घरासमोरील सांगोला रस्त्यापर्यंत कॉंक्रिटीकरण, खंडोबा गल्ली हरी पाटील घर ते मारुती वाकडे घर रस्ता कॉंक्रिटीकरण, गुंगे गल्ली येथील कसगावडे बोळ रस्ता कॉंक्रिटीकरण प्रत्येकी १० लाख मंजूर झाले आहेत.

कोंडूभैरी गल्ली येथे बोरवेल इलेक्ट्रिकल मोटर बसवणे व पाण्याची टाकी बांधून पाणीपुरवठा करणे होनमाने गल्ली येथील राम मंदिर, मंगळवेढा विजापुर रोड लगत विठ्ठल मंदिर, दामाजी मंदिराजवळील विहीर व, दक्षिण बाजूचे प्रवेशद्वार, अण्णासाहेब पाटील वस्तीगृह, बाबुभाई मकानदार घर, नूतन मराठी विद्यालय, शंकरलिंग मंदिर आठवडा बाजार, महालक्ष्मी मंदिर मुरडे गल्ली, सांगोला नाका, गणेश विहिरी समोर जय भवानी तरूण मंडळ देवी शेजारी हायमास्ट या कामांसाठी १० लाख रुपये व शशिकांत चव्हाण यांच्या घरासमोर सभागृहाच्यावर योग बांधणे १० लाख याप्रमाणे हा निधी मंजूर झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in