पडळकर स्वतःला लयं हिरो समजू नका; फायर है हम फायर... : सक्षणा सलगर यांचा इशारा

सक्षणा सलगर यांची गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका
Sakshana Salgar
Sakshana SalgarSarkarnama

सांगली : एका माणसाने (आमदार गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar) २७ तारखेला सांगलीत येऊन गोंधळ घातला. त्या व्यक्तीची मी निंदा करते. त्याबद्दल काही बोलायचे नाही, असे ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांनी मला सांगितले होते. मात्र, त्यांची माफी मागून मी बोलत आहे. भाजपला कशाला पाहिजे होते, ते पडळकरांच्या जोडीला खट्याळ बैल, ते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) कशाला पाहिजे होते. तुम्हाला निवडून येता येत नाही, तुम्हाला मतदारसंघ नाही. मतदारसंघ असता तर भाजपने तुम्हाला बारामतीत कशाला पाठवले असते, याचे उत्तर द्या, अशा शब्दांत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर (Sakshana Salgar) यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यावर हल्लाबोल केला. दरम्यान, पडळकर तुम्ही स्वतःला लयं हिरो समजू नका. लडकी समझ कर फ्लॉवर समझा है क्या...फायर है फायर है, हा पुष्पामधील डायलॉगही त्यांनी सुनावला. (Sakshana Salgar strongly criticizes Gopichand Padalkar and Sadabhau Khot)

सांगली महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या अहल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमात सलगर बोलत होत्या. माजी मंत्री महादेव जानकर, पुणे माजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते हे धनगर समाजाचे नेते आहेत. आमच्या पक्षातही आहेत. राम शिंदे भाजपत आहेत. मात्र ते कधीही असे वागत नाहीत. काहीजण मात्र नुसता गोंधळच घालतात. अहिल्यादेवी होळकरांना कशाला जातीमध्ये अडकवता. त्यांचे अखंड भारतात कार्य आहे, असेही सलगर यांनी सुनावले.

Sakshana Salgar
नवाब मलिकांची सर्वोच्च न्यायालयात धाव

सक्षणा सलगर म्हणाल्या की, भाजपला कशाला पाहिजे होता तो पडळकरांच्या जोडीला खट्याळ बैल. तो सदाभाऊ खोत. कशाला पाहिजे होता तो. अरे तुम्हाला निवडून येता येत नाही. तुम्हाला मतदारसंघ नाही. मतदारसंघ असता तर भाजपने तुम्हाला बारामतीत कशाला पाठवले असते, याचे उत्तर द्या. जत ही तुमची कर्मभूमी आणि निवडणूक बारामतीत जाऊन लढवता. तुमच्या मतदारसंघात लढा, एक सुशिक्षित तरुणी म्हणून शुभेच्छा दिल्या असत्या. फडणवीसांनी धनगर समाजाच्या लोकांना खट्याळ म्हणून वापरले, तर अहिल्यादेवींनी राघोबादादांना जसा इशारा दिला होता. तसे फडणवीसांनी एकट्या पडळकरांच्या जिवावर उड्या मारू नयेत. नागपूरच्या तंबूत बांधून ठेवण्यची हिम्मत आमच्यात आहे.

Sakshana Salgar
राष्ट्रवादीत प्रवेश करताच नाईकांसमवेत बैठक लावण्याचे पवारांचे जयंतरावांना आदेश

धनगर समाजाला मी प्रतिनिधीत्व मिळत आहे, याबाबत खंत व्यक्त करून सलगर म्हणाल्या की, विधानसभेत २८८ आमदार आणि एकटे भरणेमामाच धनगर समाजाचे मंत्री. याचे वाईट वाटतं. आमचा समाज भोळा आहे. लोकांचा पहिले चांगले होऊ द्या. त्यानंतर आमचं चांगल होऊ द्या, अशी आमची धारणा आहे. शिवाजीरावबापू शेंडगे यांनी पवारांच्या बरोबर काम केले आहे, पवारांनीही त्यांना प्रेम दिले. अशा किती आमदारक्या येतील आणि जातील. मात्र धनगर समाजाच्या घोंगडीत स्वाभिमानाची ताकद आहे, हे कोणी विसरू नये.

Sakshana Salgar
"शिवाजीराव नाईक कोणत्याही घरात गेले तरी त्यांच्याबद्दल एक खात्री होती..." : जयंत पाटील

पालकमंत्री जयंत पाटील यांनी कधीही सांगितले नाही की, येथे स्मारक करू नका म्हणून. विष्णू माने यांच्या घरात कोणीही आमदार, खासदार नाहीत. हा एक मेंढपाळाचा मुलगा स्मारकाचा उद्‌घाटनाचा कार्यक्रम घेतो. हेच त्यांच्या पोटात कालवले. एक वीट लावली या स्मारकाला, हे पडळकरांना मला विचारायचे आहे. ती लावली असती तर तुमचे स्वागत केले असते. नुसतंच दुसऱ्याचा अंगणात येऊन बाता मारायच्या. माझा त्यांना जाहीर सवाल आहे, ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. विष्णू माने, जयंत पाटील आणि धनगर समाजाचे नगरसेवक, भाजपच्या महापौर खोत यांचेही या स्मारकासाठी योगदान आहे. त्यामुळे पडळकर तुम्ही स्वतःला लयं हिरो समजू नका. लडकी समज कर फ्लॉवर समझा है क्या... फायर है फायर है.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com